Satish Rajvade Reaction on Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाह वाहिनीवरी 'आई कुठे काय करते' मालिकेचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोची जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रोमोवरुन अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोषचा आपघातात मृत्यू होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी थेट मालिका बंद करण्याची मागणी केली. आता या सगळ्या चर्चांवर चॅनेलचे हेड सतीश राजवाडे यांनी प्रतिक्रिया देत मालिका का बंद करत नाही हे सांगितले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले होते की आशुतोषचा कार अपघातात मृत्यू होतो. त्यानंतर अरुंधतीच्या आयुष्यात नवे वादळ येते. पण या वादळाला अरुंधती पुन्हा समोरी जाते आणि नव्या प्रवासाला सुरुवात करते. मालिकेच्या या नव्या वळणाला प्रेक्षकांनी बराच आक्षेप घेतलाय. त्यावर सतीश राजवाडे यांनी म्हटले की, हे तेच प्रेक्षक आहेत, ज्यांनी आई कुठे काय करते ही मालिका सुपरहिट केली.
वाचा: 'दर दोन मिनिटाला मांड्या दाखवते', किरण खेर मलायका अरोरावर संतापल्या
'आई कुठे काय करते' मालिका बंद का करत नाही यामागचे कारण सांगितले आहे. "आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षक बरेच काही बोलले आहेत. पण तो त्यांचा हक्क आहे. आम्ही त्यांना तो हक्क देतोय. कारण हे तेच रसिक प्रेक्षक आहेत, ज्यांनी ही मालिका सुपरहिट केली होती. त्यामुळे जर ते मालिका सुपरहिट करु शकतात तर मालिकेला बोलूही शकतात. पण त्याचसोबत मला खात्री आहे, ज्या वळणावर ही मालिका आम्ही घेऊन जाणार आहोत, ते लोकांना नक्की आवडेल" असे सतीश म्हणाले.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?
पुढे सतीश राजवाडे म्हणाले की, "या मालिकेला नावे ठेवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मालिका प्रगल्भ करण्यासाठी आम्हाला हे वळण आणणे गरजेचे होते. आपल्याला आई असते, पण आईला जेव्हा आईची गरज असते तेव्हा कोण असते? आपल्या सगळ्यांना गरज असते तेव्हा आई असते, पण आईला जेव्हा कोणाची गरज असते तेव्हा कोणीच नसते. त्यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे काही करतोय ते तुम्ही हा प्रवास पाहून झाल्यानंतर सांगा बरोबर आहे की चूक आहे ते"
संबंधित बातम्या