Shah Rukh Khan Childrens : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान शनिवारी ५९ वर्षांचा झाला. मुंबईत एका खास कार्यक्रमात त्याने चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. तर. यावेळी शाहरुख काही गाण्यांवर थिरकताना ही दिसला. या कार्यक्रमात शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याला किंग खानकडून जाणून घ्यायचे होते की, जेव्हा त्याची तीन मुले म्हणजेच सुहाना, आर्यन आणि अबराम यांच्यात भांडण होते तेव्हा शाहरुख खान कोणाची बाजू घेतो?
शाहरुख खान फॅन क्लबने या सोहळ्या दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमामध्ये एक चाहता विचारतो की, जर तुमची तिन्ही मुले एखाद्या विषयावरून भांडत असतील तर तुम्ही अशावेळी कोणाची बाजू घेता? यावर किंग खानने उत्तर दिले की, त्याची तिन्ही मुले आपापसात कधीच भांडत नाहीत. या तिघांनी एकमेकांशी कधीच भांडू नये, कारण असे झाले तर माझ्या मालमत्तेची विभागणी करणे खूप अवघड होऊन बसेल, असे शाहरुख खान गंमतीने म्हणाला.
शाहरुख खानने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, ‘माझ्या तिन्ही मुलांमध्ये काढी भांडण असं होत नाही. खरं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी आता असा विचार करत आहे की, आजपर्यंत यांच्यात कधी भांडण झाले का नाही आणि कधी भांडण होऊ शकेल की नाही? पण, जर या तिघांमध्ये भांडण झाले तर, माझ्या मालमत्तेचे विभाजन करण्यात खूप अडचणी येतील.’ शाहरुखने हे बोलताच तिथे उपस्थित असलेले त्याचे चाहते आपले हसू आवरू शकले नाहीत. पण, या तिघांचे कधी भांडण झालेच तर, मी मुलगी सुहानाची बाजू घेईन, असेही शाहरुख खान म्हणाला.
किंग खान म्हणाला की, ‘असं कधी झालंच तर, मला वाटतं मी सुहानाची बाजू घेईन. मला मुली खूप आवडतात. त्या खूप गोड आणि नेहमी खंबीर असतात. म्हणूनच मी सुहानाची बाजू घेईन, कारण ती एक स्ट्रेंथ साइड असेल आणि मला तिच्या पाठीशी उभं राहायला आवडेल.’ शाहरुख खान त्याच्या मुलीच्या खूप जवळ आहे. शाहरुख खान लवकरच सुजॉय घोषच्या ‘किंग’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याची मुलगी सुहाना देखील शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.