Aaryan Khan Netflix Web Series : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यावर्षी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकणार आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'द बा*ड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या 'नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स' या कार्यक्रमात शाहरुख खानने सीरिजचा फर्स्ट लूक दाखवला. या मालिकेबद्दल आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया...
'द बा*ड्स ऑफ बॉलिवूड'च्या घोषणेनंतर शोच्या टीमने सांगितले की, 'बॉलिवूडच्या झगमगाटामागे एक असे जग आहे, ज्याची कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. येथूनच नेटफ्लिक्सवरील 'द बा*ड्सऑफ बॉलिवूड' या सीरिजच्या कथेची सुरुवात होते. स्वप्नांवर बनलेल्या या जगाची कहाणी या सीरिजमध्ये आर्यन खानच्या चष्म्यातून दाखवण्यात आली आहे. यात कॉमेडी आणि ड्रामाही असणार आहे.'
आर्यन खानच्या 'द बा*ड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडचे अनेक बडे सुपरस्टार कॅमिओ करणार आहेत. या सीरिजमध्ये शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह, बॉबी देओल, करण जोहर आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सीरिजमध्ये आर्यन खानने 'किल' फेम अभिनेता लक्ष्य आणि 'पल पल दिल के पास' फेम अभिनेत्री सहर बंबा यांना मुख्य भूमिकेत घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आर्यन खान यांची ही धमकेदार वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रीलीज होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लाइन अप इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला आहे. यावेळी स्वतः शाहरुख खान देखील उपस्थित होता. त्याने या सीरिजच्या नावात असलेल्या तीन फुल्यांमागचं कारण सांगितलं आहे. या तीन फुलांचा हेतु अजिबात वाईट नाही, त्या केवळ रचनात्मक स्वरूपात दाखवण्यात आल्या आहेत, असे शाहरुख खान म्हणाला. प्रत्येक दिग्दर्शकाला त्याच्या स्वतःच्या अंदाजात आपला प्रोजेक्ट सादर करायचा असतो, असे देखील तो म्हणाला.
एकीकडे शाहरुख खान त्याच्या मुलाचे प्रमोशन करत आहे. तर, दुसरीकडे तो स्वतः देखील आगामी चित्रपटात व्यस्त आहे. शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.
संबंधित बातम्या