छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडल पाहिला जातो. हा शो सुरु झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी स्पर्धकांमुळे तर कधी परीक्षकांमुळे हा शो चर्चेचा विषय ठरतो. गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडल १३चा विजेता कोण होणार याची चर्चा रंगली आहे. आता फिनालेपूर्वीच शोचा विजेता समोर आला आहे.
इंडियन आयडल पर्व १३ची ग्रँड फिनाले १ आणि २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी या स्पर्धेतील काही स्पर्धकांनी गाणी सादर केली. आज, रविवारी या शोचा विजेता घोषीत केला जाणार आहे. यंदाचा इंडियन आयडलचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फिनाले आधीच ऋषी सिंग हा विजेता ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: मीना कुमारी यांना सेटवर खाव्या लागल्या होत्या ३१ थपडा; काय होता तो किस्सा?
इंडियन आयडल १३च्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये शिवम सिंह, ऋषी सिंह, बिडीप्ता चक्रवर्ती, चिराह कोटवाल, देबोशिता रॉय आणि सोनाक्षी कर यांनी स्थान पटकावले आहे. तर यंदाचे सिझनमध्ये नेहा कक्कर, हिमेश रेशमीया आणि विशाल दादलानी हे परिक्षक म्हणून काम करत होते. आता इंडियन आयडल १३च्या विजेते पदावर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आज प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.