Sohail Khan Rumored Girlfriend: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच सोशल मीडियावर सोहेलचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहार आला आहे का, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता सोहेलने या सर्व गोष्टींना अफवा असल्याचे म्हटले आहे. सोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे देखील त्याने सांगितले.
डेटिंगच्या अफवांबाबत सोहेलने'हिंदुस्तान टाईम्स'ला सांगितले की, ज्या काही बातम्या समोर येत आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. तो म्हणाला, ‘ती माझी गर्लफ्रेंड आहे, हे अजिबात खरे नाही. ती माझी फक्त एक जुनी मैत्रीण आहे. मी तुम्हाला याचे उत्तर देतो आहे. कारण, तुम्ही काहीही लिहिण्याआधी मला येऊन विचारलं आहे.’
सोहेल खानचा हा व्हायरल व्हिडीओ एका पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सोहेल रेस्टॉरंटमधून बाहेर पडत कारमध्ये बसताना दिसला आहे. त्याचवेळी कारच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसलेली दिसते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक अनेक प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. यावर एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘सलमानच्या वाटणीचा रोमान्स देखील अरबाज आणि सोहेलने हिरावून घेतला.’ तर, एकानेकमेंट करत लिहिले की, ‘कोणीतरी आमच्या सलमान भाईलाही डेटवर घेऊन जा’. मात्र, आता ती मिस्ट्री गर्ल त्याची गर्लफ्रेंड नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीमापासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच सोहेल खान डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. सोहेलने१९९८मध्ये सीमा सजदेहशी लग्न केले होते. दोघांचेही आधी आर्य समाजात लग्न झाले होते. यानंतर त्यांचा निकाह झाला होता. लग्नाच्या२४ वर्षानंतर म्हणजेच२०२२मध्ये दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे संपवले. घटस्फोटाचे कारण अद्याप कोणालाच माहित नसले, तरी सततच्या भांडणामुळे दोघांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या जोडप्याला निर्वाण आणि योहान ही दोन मुले देखील आहेत. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अरबाज सध्या निर्मिती क्षेत्रात अधिक सक्रिय आहे.