मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिक्रेट वेडिंग करणाऱ्या तापसी पन्नूचा पती आहे तरी कोण?

सिक्रेट वेडिंग करणाऱ्या तापसी पन्नूचा पती आहे तरी कोण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 26, 2024 02:13 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नुकताच गुपचूप लग्न केले आहे. तिने प्रियकाराशी लग्न केले. पण तापसीचा पती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सिक्रेट वेडिंग करणाऱ्या तापसी पन्नूचा पती आहे तरी कोण?
सिक्रेट वेडिंग करणाऱ्या तापसी पन्नूचा पती आहे तरी कोण?

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अनेक कलाकार हे लग्नबंधनात अडकत आहे. मग मराठी चित्रपटसृष्टी असू किंवा बॉलिवूड कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याकडे जास्त लक्ष देताना दिसत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण तापसीने कोणाशी लग्न केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तापसीने उदयपूरमधील एका हॉटेलमध्ये लग्न केले. कोणताही तामझाम नको असल्यामुळे तिने अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. २० मार्च रोजी तापसीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. त्यानंतर ३ ते ४ दिवस त्यांचा विवाहसोहळा पार पडल्याचे म्हटले जात आहे. तापसीच्या जवळचे मित्र आणि अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित तापसीचा विवाह सोहळा पार पडला.
वाचा: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाला दिलासा, तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ

तापसीचा पती आहे तरी कोण?

तापसीने प्रियकर मॅथियास बोईसोबत लग्न केले आहे. आता तापसीचा नवरा आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मॅथियास हा एक डॅनिस बॅडमिंटनपटू आहे. २०१४ मध्ये तापसी आणि मॅथियासच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. एका सामन्यादरम्यान, तापसी मॅथियानला प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. मॅथियास हा ४३ वर्षांचा आहे.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

तापसी आणि मॅथियासची भेट कधी झाली?

२०१३ मध्ये झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये पहिल्यांदा तापसी आणि मॅथियास भेटले होते. मॅथियास हा लखनऊमधील एका टीमच्या वतीने खेळत होता. तेव्हा तापसी हैदराबाद टीमची ब्रँडअॅम्बेसिडर होती. हळूहळू त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. नंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. अखेर २० मार्च २०२४ रोजी तापसी बोहल्यावर चढली.

कोण पाहुणे तापसीच्या लग्नाला होते?

तापसीने इंडस्ट्रीमधील मोजक्याच लोकांना बोलावले होते. तिने तिच्या जवळचा मित्र आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपला बोलावले होते. तसेच थप्पड चित्रपटातील कोस्टार पावेल गुलाटीही हजर होता. तसेच कनिका ढिल्लन, हिमांशू शर्मा, स्टँडअप कॉमेडियन अभिलाष थपियाल हे तापसीच्या लग्नाला उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. तापसीने अद्याप सोशल मीडियावर लग्नातील एकही फोटो शेअर केलेला नाही.

IPL_Entry_Point