Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक सूरज चव्हाण हा सर्वांची मने जिंकत आहे. सर्वांना जीव लावणारा, चुकीच्या गोष्टींविरोधात बोलणारा, अतिशय साध्या स्वभावाचा सूरज चांगला खेळ खेळताना दिसत आहे. एका खेडे गावातून आलेल्या सूरजने शोमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत केवळ दोन टी-शर्ट आणले होते. तसेच पायात त्याने तुटलेली चप्पल घातली होती. आता तो शोमध्ये डिझायनर कपडे घालताना दिसत आहे. सूरजला डिझायनर कपडे कोण देतय असा प्रश्न सर्वांना पडला होता.
सध्या सगळीकडे बिग बॉस मराठी सिझन पाचमधील स्पर्धक सूरज चव्हाणची हवा पाहायला मिळते. तो घरातील स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सूरज जेव्हा बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला तेव्हा केवळ दोन टी-शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घालून आला होता. त्याला सेटवर आल्यावर कपडे देण्यात आले होते. आता घरात सूरज इतर स्पर्धकांप्रमाणे डिझायनर कपडे घालत आहे. भाऊच्या धक्क्यावर देखील सूरजच्या कपड्यांची प्रशंसा होत आहे. आता हे अचानक कसे झाले चला जाणून घेऊया.
सूरजचे कपडे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सौम्या पठाण डिझाइन करत आहे. तिने सूरजचा प्रत्येक ड्रेस डिझाइन केला आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक इन्फ्लूएंसर सौम्या सूरजचे कपडे डिझाइन करत असल्याचे सांगत आहे. तसेच सूरजसाठी डिझाइन करण्यात आलेले कपडे हे त्यालाच देण्यात आले आहेत. कारण, एरवी सदस्यांसाठी डिझाइन केलेले कपडे हे त्यांनी वापरुन झाल्यावर परत करण्यात येतात. मात्र, डिझायनर सौम्याने हे कपडे सूरजलाच दिले आहेत. पण सूरजकडून या कपड्यांचे पैसे घेतले जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण यापूर्वी बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरने विनिंग अमाऊंटमधून वजा केल्याचे समोर आले होते.
शिव ठाकरेने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये ‘बिग बॉस मराठी’ सीझन २ हा शो जिंकला असला तरी जिंकलेल्या रकमेपैकी निम्म्याहून अधिक रक्कम कापली गेल्याचा खुलासा केला होता. शिवने म्हटले की, पहिला या शोच्या विजेत्यांना बक्षीस रक्कम म्हणून २५ लाख रुपये मिळणार होते. पण, नंतर फिनालेच्या वेळी शेवटच्या क्षणी एक ट्विस्ट आला आणि विजेत्याची रक्कम १७ लाख रुपये करण्यात आली. पण हे इथेच थांबलं नाही. यानंतर आणखी काही काटछाट करून बक्षीस रक्कम म्हणून फक्त ११.५ लाख रुपये हातात आले. इतकेच नाही, तर कुटुंबाच्या विमान तिकीट भाडे आणि काही कपड्यांचे बिल यांसारख्या इतर सुविधाही कमी करण्यात आल्या.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रियॅलिटी शोद्वारे सुरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला, तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सुरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'राजाराणी' या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मनं जिंकली होती. आता या सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार्या या चित्रपटात सुरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सुरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. सुरजचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.