बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी : द डायमंड बझार' ही सीरिज सध्या प्रचंड गाजली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमधील आलमजेबच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अदा, लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की तिची आईही संजय भन्साली यांची बहीण बेला सेहगल आहे. पण बेला सेहगल आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आलमजेबच्या आईविषयी…
बेला सेहगलने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात भाऊ संजय सोबतच केली आहे. तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'खामोशी: द म्युझिकल' (१९९६), 'हम दिल दे चुके सनम' (१९९९), 'देवदास' (२००२), 'ब्लॅक' (२००५) आणि 'सांवरिया' (२००७) या चित्रपटांसाठी बेलाने संजय यांच्यासोबत काम केले आहे.
वाचा: उफ्फ ये अदाये! अमृता खानविलकरने मुंबई पोलिसांसाठी असे का म्हटले? नेमकं काय आहे प्रकरण
मध्ये बोमन इराणी आणि फराह खान अभिनीत 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' या रोमँटिक विनोदी चित्रपटातून बेलाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट दक्षिण मुंबईतील पारशी समुदायावर आधारित असून ४० वर्षांहून अधिक वयाच्या दोन पारशी लोकांच्या प्रेमात पडण्याभोवती फिरतो.
वाचा: ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट
बेलाचे लग्न एका फिल्मी कुटुंबात झाले आहे. त्यांचे पती दीपक सेहगल हे समीर नायर यांच्या 'अॅप्लॉज एंटरटेन्मेंट' या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कंटेंट हेड आहेत. भन्साळी प्रॉडक्शनसोबत ‘ब्लॅक’ या चित्रपटाची सहनिर्मिती करून त्याने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले. गेल्या वर्षी आपल्या चित्रपट निर्मिती व्यवसायाला पुनरुज्जीवित करत अॅप्लॉज एंटरटेन्मेंटने ‘झ्विगाटो’, ‘दो और दो प्यार’ आणि आगामी चित्रपट ‘द रेपिस्टला’ पाठिंबा दिला आहे. माइंड द मल्होत्रा, क्रिमिनल जस्टिस, द ऑफिस (इंडियन अ ॅडप्टेशन), स्कॅम 1992, ताज: डिवाइड बाय ब्लड या सीरिजची निर्मिती देखील त्यांमी केली आहे.
वाचा: मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर
बेला यांचे सासरे मोहन सेहगल हेदेखील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. १९७० साली दिग्दर्शित 'सावन भादों' या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची हिंदी चित्रपट रसिकांशी ओळख करून देण्यासाठी ते ओळखले जातात.