R Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  R Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

R Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 25, 2024 03:14 PM IST

R Madhavan Wife: आर माधवन त्याच्या एका विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला. ही विद्यार्थीनी कोल्हापूरची एक मराठमोळी अभिनेत्री होती. याच विद्यार्थीनीशी आर. माधवनने लग्न केले.

R Madhavan Wife
R Madhavan Wife

‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील मॅडी म्हणजेच आर माधवनने आपल्या क्युटशा स्माईलने ९० दशकातील तरुणींना भुरळ घातली होती. आर. माधवन आजही लाखो तरूणींच्या हृदयाची धडकन आहे. मात्र तामिळ कुटुंबातून आलेल्या या हँडसम कलाकाराचे हृदय अखेर एका मराठमोळ्या कोल्हापूरकर मुलीनेच जिंकले होते. तुम्हाला माहीत आहे का? की आर. माधवन चक्क त्याच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता. होय! माधवनची पत्नी सरीता बिर्जे ही त्याची माधवनची विद्यार्थिनी होती. काय आहे आर माधवनची लव्हस्टोरी आणि त्याच कोल्फापूर कनेक्शन चला जाणून घेऊया..

कोल्हापूरमधून झाले शिक्षण

फार कमी लोकांना माहित असेल की आर माधवनने आपलं शिक्षण कोल्हापूर मध्ये पूर्ण केले आहे. मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १९८८ मध्ये माधवनने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेतले होते. जवळपास पाच वर्षे तो कोल्हापुरात वास्त्यव्यास होता. सुरुवातील राजाराम हॉस्टेलमध्ये दिवस काढल्यानंतर तो राजारामपुरीत भाड्याच्या खोलीत राहू लागला. शिक्षण पूर्ण केल्यावर १९९१ दरम्यान तो कोल्हापूरमध्येच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस घेऊ लागला.

सरिताने विचारले होते डिनर डेटसाठी

एका क्लासदरम्यान आर माधवन आणि सरिताची पहिल्यांदा भेट झाली. सरिता एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत होती. त्यासाठी तिने माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंच्या क्लासमध्ये अॅडमिशन घेतले होते. माधवनच्या शिकवणीनंतर सरिता इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण झाली. म्हणून माधवनचे आभार मानण्यासाठी तिने त्याला डिनर डेटसाठी विचारले होते. सरिताचे डिनरसाठी विचारणे माधवनला खूपच क्यूट वाटले होत. माधवने मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘सरिता माझी विद्यार्थिनी होती आणि जेव्हा तिने डेटसाठी विचारले तेव्हा मी विचार केला की, ही एक चांगली संधी आहे. माझा रंग असा आहे आणि माझं कधी लग्न होईल की नाही त्यामुळे मी लगेच होकार दिला होता.’

या एका डिनर डेटने त्यांचे आयुष्य बदलले होते. त्यांच्यातले बॉंडिंग हळू हळू वाढत गेले आणि अखेर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी तब्बल आठ वर्ष एकमेकांना डेट केले. विशेष म्हणजे ते दोघे जेव्हा एकमेकांना डेट करत होते तोपर्यंत आर माधवनने सिनेसृष्टीत कोणतेही नाव कामावले नव्हते. लग्नानंतर माधवनच्या आयुष्याला वेगळे वळण आले.

पहिला टीव्ही शोनंतर केले लग्न

पार्टटाईम नोकरीसह त्याने मॉडेलिंग आणि टी. व्ही क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. १९९७ मध्ये दूरदर्शनचा सी हॉक्स या मालकेत त्याला महत्वपूर्ण भूमिका मिळाली जी चांगलीच लोकप्रिय ठरली. याचदरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ८ वर्षांचा डेटिंग नंतर ६ जुन १९९९ मध्ये या दोघांनी पारंपरिक तामिळ पद्धतीने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या २ वर्षानंतर म्हणजेच २००१ मध्ये माधवनचा ‘रेहना है तेरे दिल में’ रीलीज झाला आणि या चित्रपटातून माधवाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...

माधवन आणि सरिता यांच्या लग्नाला २४ वर्ष झाली असून ते दोघे आज सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव वेदांत आहे. वेदांत स्विमिंगमध्ये देशाचे नाव मोठे करताना दिसत आहे.

Whats_app_banner