Who Is Ramesh Pardeshi AKA Pitya Bhai: पुण्याच्या ‘वेताळ टेकडी’वर मद्यधुंद झालेल्या तरुणाईचं विदारक सत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवणारे ‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेत्री रमेश परदेशी सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत. या व्हिडीओने महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला असून, यामुळे अभिनेते रमेश परदेशी देखील प्रचंड चर्चेत आले आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘पिट्या भाई’ या भूमिकेने त्यांना अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली होती. त्यांचा मनोरंजन विश्वातला हा प्रवास फारसा सोपा नव्हता. अभिनेता असण्यासोबतच रमेश परदेशी एक उद्योजक देखील आहेत.
‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांची मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील व्यावसायिक होते. आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं आणि आपला बिझनेस सांभाळावा, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, रमेश परदेशी यांना अभिनयाची आवड होती. जेव्हा रमेश परदेशी यांनी अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी विरोध केला होता. मात्र, यावेळी रमेश परदेशी यांना त्यांच्या काकाने साथ दिली. काकांच्या साथीमुळेच रमेश परदेशी यांनी पहिलं नाटक केलं. त्यांना रंगभूमीवर पाहून त्यांच्या काकांना खूप आनंद झाला होता. यानंतर, जेव्हा त्यांनी पहिला मराठी चित्रपट केला, तेव्हा देखील त्यांचा काकांना अप्रूप वाटले होते.
अभिनेते रमेश परदेशी यांनी चित्रपटांमधून अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक अधिक गाजला. मात्र, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘पिट्या भाई’ ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. या आधी रमेश परदेशी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘बेरीज वजाबाकी’ आणि अजय देवगण याच्या ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांचामातीची रांजण, कुंड्या, मडकी, किल्ले बनवून, ते रंगवून विकणे हा व्यवसाय देखील करतात. पौंड फाट्यावर त्यांचे घर आहे. याच घरून ते हे काम करतात. दरवर्षी हे काम करण्यासाठी खास सुट्टी घेऊन रमेश परदेशी आपल्या गावच्या घरी जातात.