Who Is Kinza Hashmi : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मी आणि 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी यांच्या काहींनी फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी ते दोघे एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असावेत, असे कयास बांधले होते. चाहत्यांचा हा कयास खरा ठरला आहे. दोघे एकत्र प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. या दरम्यान त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता, या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.
लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मीने २०१४मध्ये 'अधुरा मिलन' मालिकेतून पडद्यावर पदार्पण केले आणि अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या. तिने २०१८मध्ये 'इश्क तमाशा'मध्ये ग्रे शेड भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'गुल-ओ-गुलजार'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली. ती अखेर 'मेरे बन जाओ' या मालिकेमध्ये दिसली होती.याशिवाय 'मैके को देदो संदेस', 'मोर महल', 'मोहब्बत तुमसे नफरत है', 'सीरत', 'वेहम', 'खुशबो में बसे खत' आणि 'हम दोनो' यासह अनेक टीव्ही शोमध्ये ती दिसली आहे. तिने २०२४मध्ये 'कट्टर कराची' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
नुकताच तिने मुनव्वर फारुकीसोबतच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही स्टार्स स्टँड-अप कॉमेडियनच्या 'धंधो' गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. किंझा मुनव्वरचे 'धंधो' गाणे ऐकत असते, तेव्हा तो अचानक व्हिडिओमध्ये सामील होतो. ती त्याला गंमतीने विचारते की, 'आप कौन?' आणि विनोद करत पुढे म्हणते की,'क्या अजीब लोग हैं यार. व्हिडिओ खराब कर दिया.' त्यानंतर मुनव्वर तिचा फोन हिसकावून पळून जातो आणि म्हणतो की, 'मेरेको नहीं जानती ना, अभी धुंडेगी मेरेको. व्हिजा भी नहीं मिलेगा.' त्यांच्या या फन केमिस्ट्रीला चाहत्यांकडून आधीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
मुनव्वर फारुकीचे २०१७मध्ये जस्मिनशी लग्न झाले. पण, २०२२मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. या जोडप्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. मे २०२४मध्ये मुनव्वर फारुकीने मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवाला हिच्याशी लग्न केले. या दरम्यान, तो सोशल मीडिया स्टार नाझिला सिताशीला डेट करत होता आणि 'बिग बॉस १७'मध्ये असताना आयशा खानने त्याच्यावर डबल डेटिंगचा आरोप केला होता.
स्टँड-अप कॉमेडियनने कंगना रणौतचा 'लॉक अप १' देखील जिंकला होता आणि त्यानंतर त्याने 'बिग बॉस १७' जिंकला. त्यापूर्वी तो 'कोल्ड लस्सी और चिकन मसाला'मध्ये रोस्ट कॉमिक म्हणून दिसला होता. त्याने 'सुहागन: के रंग जश्न के रंग', 'डान्स दीवाने ४', 'मॅडनेस मचायेंगे – इंडिया को हसाएंगे', 'बिग बॉस ओटीटी सीझन ३' आणि 'स्टार व्हर्सेस फूड सर्व्हायव्हल'मध्ये विशेष भूमिका केल्या आहेत.
संबंधित बातम्या