ऑरी कोण आहे? असा प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जात आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' सिझन ८ मधील तिसऱ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या दोघींनाही योग्य उत्तर देता आले नाही. त्यामुळे ऑरी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
ऑरीचे पूर्ण नाव ओरहान अवतरमणी असे आहे. त्याने तमिळनाडूमध्ये शालेय शिक्षण घेतले आहे. १२वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ऑरी कोलंबिया यूनिवर्सिटीमध्ये गेला. ऑरीने २०१६ साली सारा अली खानसोबत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. एका मुलाखतीमध्ये स्वत: ऑरीने सांगितले होते की न्यूयॉर्क मधील एका प्रसिद्ध कॉलेजमधून त्यान डिझायनिंगचे शिक्षण घेतले होते. त्याने काही स्टारकिड्ससोबत शिक्षण घेतल्यामुळे आता ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
वाचा: शाहरुखच्या मुलीचा पहिला सिनेमा येतोय! 'द आर्चिस'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
ऑरी हा अंबानी कुटुंबीयांच्या देखील जवळचा आहे. ऑरीच्या लिंक्डइन प्रोफाइलच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरपर्सनसोबत ऑरीने एक प्रोजेक्ट केला होता. तो गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीसाठी काम करत आहे. त्यामुळे अनेकदा निता अंबानी यांच्यासोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
ऑरी हा केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड स्टार्सला देखील ओळखतो. एका फॅशन शो दरम्यान त्याची ओळख कान्ये वेस्टशी झाली होती. ऑरीने कायली जेनरच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला होता. त्याचा ट्रॅविस स्कॉटसोबत पार्टी करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की 'बर्बरी फॅशन शोमध्ये कान्येने माझ्या कपड्याची प्रशंसा केली होती. तेव्हा पासून आमच्यामध्ये संवाद सुरु झाला. बोलत बोलत आम्ही पॅरिस फॅशन विकविषयी देखील बोलत होतो. तेव्हा पासून आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली.'
संबंधित बातम्या