मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: हातात हात घालून दिसणारा कंगनासोबतचा तो ‘मिस्ट्री मॅन’ कोण ?

Kangana Ranaut: हातात हात घालून दिसणारा कंगनासोबतचा तो ‘मिस्ट्री मॅन’ कोण ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 14, 2024 09:53 AM IST

Kangana Ranut Bf: शुक्रवारी कंगना रणौत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनसोबत हातात हात पकडून फिरताना दिसली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ही व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Kangana Ranut Bf
Kangana Ranut Bf

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. आजकाल तिचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीत. कंगना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा हा पकडताना दिसली. आता ही व्यक्ती कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कंगना शुक्रवारी एका सलॉनमध्ये गेली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सने तिला स्पॉट केले. यावेळी कंगनाने आकाशी रंगाचा टॉप घातला आहे. तसेच केस मोकळे सोडून डोळ्याला गॉगल लावलेला आहे. कंगनासोबत असलेल्या मिस्ट्री मॅनने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसणारा विदेशी व्यक्ती कोण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वाचा: डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क; बॉलिवूड सुपरस्टारचा लपूनछपून मेट्रोने प्रवास

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये एका मुलाखतीत कंगना लग्नाबद्दल बोलली होती. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि जर ती वेळ तिच्या आयुष्यात यायची असेल तर ती येईल, असे अभिनेत्री म्हणाली होती. कंगनाने असेही सांगितले होते की, तिला लग्न करून फॅमिली स्टार्ट करायची आहे, पण ती योग्य वेळ आल्यावरच मी हे करेन असं कंगना म्हणाली होती.

काही वर्षांपूर्वी कंगना ब्रिटीश डॉक्टर निकोलस लाफर्डीला डेट करत होती. निकोलसला कंगनाशी लग्न करायचे होते. मात्र, त्यावेळी कंगनाचे वय केवळ २५ वर्षे होते आणि तिचे लक्ष करिअरवर केंद्रीत होते. तिचे निकोलसवर प्रेम होते. पण तिला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आता कंगनाच्या आयुष्यातील ही नवीन व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग