Who Is Irina Rudakova: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात एन्ट्री करणारी विदेशी बाला इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Who Is Irina Rudakova: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात एन्ट्री करणारी विदेशी बाला इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?

Who Is Irina Rudakova: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात एन्ट्री करणारी विदेशी बाला इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?

Jul 29, 2024 10:05 AM IST

Who Is Irina Rudakova:‘मराठी बिग बॉस ५’च्या घरात यावेळी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चर्चित चेहरे सहभागी झाले आहेत. त्यात इरिना रुडाकोवा हिचा देखील समावेश आहे.

इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?
इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?

Who Is Irina Rudakova:बिग बॉस मराठी सीझन ५’च्या ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात सगळ्याच स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे. अनेक मराठी कलाकारांसह यावेळी हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही ‘बिग बॉस मराठी सीझन ५’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात एका विदेशी बालेने धमाकेदार पदार्पण केलं आहे. इरिना रुडाकोवा असं तिचं नाव असून, तिच्या येण्याने या घरात एक वेगळाच मसाला पाहायला मिळणार आहे. मात्र, ही इरिना रुडाकोवा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबद्दल...

‘मराठी बिग बॉस ५’च्या घरात यावेळी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चर्चित चेहरे सहभागी झाले आहेत. त्यात इरिना रुडाकोवा हिचा देखील समावेश आहे. इरिना रुडाकोवा ही कोणत्या देशातून आहे, याबद्दल फारशी माहिती सोशल मीडियावर उपलब्ध नाही. मात्र, ती आयपीएलपासून चर्चेत आली आहे. आयपीएलमध्ये इरिनाने चीयर लीडर म्हणून काम केले होते. यानंतर तिने ‘छोटी सरदारनी’ नावाच्या एका हिंदी टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेतून तिला वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेतून ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या शिवाय इरिना रुडाकोवा ही योग प्रशिक्षक देखील आहे.

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी जेठालाल आणि गोली यांना किती मिळायचे मानधन? समोर आले आकडे

सोशल मीडियावर इरिनाची हवा!

या परदेशी पाहुणीने ‘बिग बॉस मराठी ५’च्या मंचावर धमाकेदार एन्ट्री घेतली घेतली होती. तिने एक दमदार डान्स परफॉर्मन्स देखील सादर केला. तर, मंचावर तिने मराठीतून बोलण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, तोडक्या मोडक्या मराठीतही तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावर देखील इरिना रुडाकोवा हिचा मोठा जलवा आहे. सोशल मीडियावर तिला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये आल्यानंतर देखील तिला मोठा चाहता वर्ग लाभणार आहे. आता ती या शोमध्ये काय जादू दाखवणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोण कोण झालंय सामील?

‘बिग बॉस मराठी सीझन ५’च्या या शोमध्ये यंदा एकूण १६ स्पर्धक सामील झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू-वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजित सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सुरज चव्हाण हे स्पर्धक सामील झाले होते.  

  

Whats_app_banner