गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बिग बॉस मराठी' सिझन पाच हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. यावेळी या शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तसेच शोमधील स्पर्धकांमध्ये केवळ कलाकारच नसून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर देखील आहेत. त्यामधील अंकिता वालावलकर विशेष चर्चेत आहे. आता नेमकी कोण आहे चला जाणून घेऊया...
अंकिता वालावलकर ही मूळची मालवणची आहे. तिने इंजिनिअरींगमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. मालवणी भाषेचा तिचा लहेजा हा प्रेक्षकांना विशेष आवडतो. इन्स्टाग्रामवर अंकिताचे जवळपास ६ लाख फॉलोअर्स आहेत. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. आता अंकिता बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत.
अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याच्या जेव्हा चर्चा सुरु झाल्या तेव्हा पासून तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलले जात होते. अनेकांनी अंकिताचे लग्न झाले असे देखील म्हटले. पण खरं तर अंकिताचे लग्न झालेले नाही. तिने वयाच्या १६व्या वर्षी बॉयफ्रेंडसाठी घर सोडले होते. घरातल्यांचा विरोध असूनही ती बॉयफ्रेंडच्या आईसोबत राहात होती. पण तिचा बॉयफ्रेंड सतत तिला मारहाण करायचा. तिच्यावर मानसिक अत्याचार करायचा. त्यानंतर दोन वर्षांनंतर अंकिताने पुन्हा आई आणि वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या आई-वडिलांनी देखील तिला पुन्हा घरात घेतले. आता अंकिताचा एक बॉयफ्रेंड आहे. तिने कधीही बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवलेला नाही.
वाचा: इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर
बिग बॉस मराठी ५मध्ये वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तंबोळी, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, निखील, योगिता चव्हाण, जान्हवी किलेकर, घनःश्याम दरवडे, इरिना रुडिकोवा, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल, आर्या जाधव,पुरुषोत्तमदादा पाटील, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे स्पर्धक दिसत आहेत.
संबंधित बातम्या