Sona Pandey Controversy : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' असं म्हटलं की पहिला चेहरा डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राखी सावंत. राखीने आपल्या अभिनयाने आणि आपल्या विचित्र हरकतींनी नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. राखी सावंत सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही विचित्र प्रकार करत असते. मात्र, आता राखी सावंतला टक्कर देणारी 'भोजपुरीतील राखी सावंत' सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. लोकांनी एका भोजपुरी अभिनेत्रीला राखी सावंतचा टॅग दिला आहे.भोजपुरीतील ही राखी सावंत आहे तरी कोण? चला जाणून घेऊया...
राखी सावंतची चर्चा चित्रपटांबाबत कमी आणि वादांमुळे जास्त असते. बॉलिवूडच्या राखी सावंत प्रमाणेच भोजपुरी सिनेमा विश्वातही आता एक राखी सावंत तयार झाली आहे. या अभिनेत्रीची चर्चा देखील सर्वाधिक वादांमुळेच होत आहेत. राखी सावंतप्रमाणेच ही भोजपुरी अभिनेत्री देखील मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करताना दिसतेय. या अभिनेत्रीचं नाव आहे सोना पांडे. भोजपुरी मनोरंजन विश्वात सध्या स्ट्रगल करणारी सोना पांडे ही काही छोट्या म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली आहे. मात्र, अद्याप तिच्या हातात कुठलाही मोठा प्रोजेक्ट नाही. आता या सोना पांडेची तुलना राखी सावंत सोबत का केली जात आहे? चला जाणून घेऊया...
मनोरंजन विश्वात दररोज हजारो लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. पण, प्रत्येकालाच ही संधी मिळेल असं नाही. काहींना संधी मिळते आणि त्या संधीच सोनं करून त्यांना पुढे जाता येतं. मात्र, काही लोक त्याच ठिकाणी अडकून पडतात, अशाचपैकी एक आहे सोना पांडे. अभिनेत्री सोना पांडे हिने २०२४मध्ये तुफानी लाल यादव याच्यासोबत एका गाण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. मात्र, यानंतर दोघांमध्ये इतके वाद झाले की, या वादांमुळेच सोना पांडे चर्चेत आली आणि लोकांनी तिला भोजपुरीतील राखी सावंत म्हणण्यास सुरुवात केली. सोना पांडे हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने भोजपुरीतील प्रसिद्ध गायक तुफानी लाल यादव याच्यावर काही आरोप केले होते.
गायक तुफानी लाल यादव याने तिला काम देण्याच्या बहण्याने काही मागण्या केल्याचा दावा तिने केला आहे. सोना पांडेने एका मुलाखतीत उघडपणे या गोष्टी सांगितल्या आहेत. इतकंच नाही तर, मला खरं सांगायला अजिबात लाज वाटत नाही, असे देखील तिने या मुलाखतीत म्हटलं. मात्र, ती जे काही करतेय, ते केवळ मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी करते, असं लोकांना वाटत आहे. त्यामुळेच लोकांनी तिचं नाव भोजपुरीतील राखी सावंत ठेवलं आहे. या मुलाखतीत ती अशा काही गोष्टी बोलली आणि तिने असे काही शब्द वापरले होते, जे सर्वसामान्य कधीही एकट्यातही वापरत नसतील. त्यामुळे सोना पांडे वादात अडकली होती. मात्र, तिने या वादाला देखील तोंड दिलं. २०१८च्या सुमारास सोना पांडे हिने मनोरंजन विश्वास एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, तिला अद्याप कोणतीही मोठी संधी मिळालेली नाही.
संबंधित बातम्या