छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १८वे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक अविनाश मिश्रा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आता त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अविनाशची कथित गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे.
अविनाश हा अभिनेत्री भाविका शर्माला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. भाविका ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे जी 'मॅडम सर' आणि 'घुम है किसिके प्यार में' सारख्या अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये दिसली होती. या मालिकांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी तिने मनोरंजन सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. परवरिश सिझन २ या मालिकेद्वारे तिने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर जिजी मां या मालिकेत काम करताना ती दिसली.
२०२० ते २०२३ या काळात भाविकाने 'मॅडम सर' या मालिकेत कॉन्स्टेबल संतोष शर्माची भूमिका साकारली होती. मात्र, नंतर तिने काही कारणास्तव मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी 'घूम है किसिके प्यार में' या मालिकेतील सावी चव्हाण या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती.
अविनाश मिश्रा बिग बॉस १८ च्या घरात येण्यापूर्वी तो भाविका शर्माला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. एकत्र वेळ घालवतानाचे त्यांचे फोटो चाहत्यांनी पाहिले होते. मात्र, दोघांनीही या नात्याला दुजोरा दिला नाही. बिग बॉस १८ च्या घरात अविनाशची एन्ट्री झाल्यानंतर दोघांच्या एका मित्राने दावा केला होता की अभिनेता खरोखरच भाविकाला डेट करत होता, परंतु दोघांना हे सार्वजनिक करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या दोघांनी कधीही प्रेमाची कबुली दिली नाही.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
बिग बॉस १८च्या नव्या प्रोमोमध्ये पत्रकार श्वेता सिंह अविनाश मिश्रला ईशा शर्मासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर अविनाशने ते केवळ चांगले मित्र-मैत्रिणी असल्याचे सांगितले. त्यावर अविनाश म्हणाला की, 'असे काही नाही. ईशा माझी चांगली मैत्रिण आहे. मैत्रिण म्हणून ती मला आवडते.' त्यानंतर अविनाश मिश्राच्या खासगी आयुष्यातील अफवांना उत्तर देताना श्वेता सिंह म्हणाली की, सोशल मिडिया असे म्हटले जात आहे की बाहेर तुमचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर आहे. त्यावर त्याने या सगळ्या अफवा आहेत. मी सिंगल आहे असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या