मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan Son: आमिर खानचा लेक जुनैद सध्या काय करतो?

Aamir Khan Son: आमिर खानचा लेक जुनैद सध्या काय करतो?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2024 09:35 PM IST

Who is Aamir Khan Son: सध्या आमिर खानचा लेक जुनैद खान हा चर्चेत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो सध्या काय करतो चला जाणून घेऊया...

Aamir Khan Son
Aamir Khan Son

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयराचा विवाहसोहळा नुकताच पडला. तिने सर्वात आधी तिने रजिस्टर पद्धतीने केले. त्यानंतर उदयपूरमध्ये तिने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नातील फोटो तुफान व्हायरल झाले होते. उदयपूरवरुन आल्यावर आयराच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांना बोलावण्यात आले होते. दरम्यान, आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आता जुनैद काय करतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आमिर खान आणि रीना यांना जुनैद व आयरा ही दोन मुले आहेत. तर किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आता आयराच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंबीय एकत्र आले होते. त्यांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या फोटोंमधील आमिर खानचा मोठा लेक जुनैद चर्चेचा विषय ठरला. आता हँडसम दिसणारा जुनैद सध्या काय करतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: आयराच्या रिसेप्शनमधील श्रुती हासनच्या 'त्या' कृतीने जिंकली चाहत्यांची मने

आमिरची दोन्ही मुले ही इंडस्ट्रीपासून लांब असल्यामुळे चर्चेचा विषय ठरतात. जुनैदचा जन्म १९९३ साली झाला होता. तो ३० वर्षांचा आहे. जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पदार्पणासाठी त्याने वडील आमिर खानची मदत घेतलेली नाही. याबद्दल आमिर खानने स्वत: माहिती दिली होती. जुनैदला पहिला चित्रपट मिळण्यापूर्वी १५ वेळा नकार मिळाला होता, असे देखील तो म्हणाला.

जुनैद हा २०१८ पासून नाटकांमध्ये काम करत आहे. त्याने अभिनयाचे योग्य ते शिक्षण घेतले आहे. आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या 'महाराजा' या चित्रपटातून तो निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. तसेच अभिनेता म्हणून देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

जुनैदचे राहणीमान हे अतिशय साधे आहे. तो प्रवास करताना लग्झरी गाड्या किंवा विमानाचा वापर करत नाही. तो अनेकदा ट्रेनने प्रवास करणे योग्य मानतो. रेल्वेच्या प्रवासाला तो प्राधान्य देतो. आमिर खानने याबाबत माहिती दिली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग