Who is Aarohi Real life Boyfriend: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन असल्याचे दिसत आहे. आता या मालिकेतील आरोहीने खऱ्या खुऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. तिने डिसेंबर महिन्यात साखरपुडा केला. त्यानंतर आता तिचा नवरा आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत आरोही हे पात्र अभिनेत्री कौमुदी वलोकर साकारत आहे. तिची आणि यशची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी कौमुदीने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. तिने आकाश चौकशेशी साखरपुडा केला आहे. या साखपुड्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. मालिकेतील काही कलाकार देखील तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. पण आकाश हा कोण आहे? काय करतो? त्याचे शिक्षण किती? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत चला जाणून घेऊया कौमुदीच्या नवऱ्याविषयी...
वाचा: वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे कारण?
कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाशने याआधी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइलवर ‘आरोहीचा खरा यश’ असं लिहिलं होतं. पण आता त्याने प्रोफाइल बदललं आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदीचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसेच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.
कौमुदीने बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. तिने 'शाळा' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होकी. त्यानंतर ती ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या काही चित्रपटांत काम करताना दिसली. त्यानंतर आता कौमुदी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आरोही हे पात्र साकारताना दिसत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. यापूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत काम करताना दिसली होती.