बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप समिट २०२४ मध्ये भाग घेतला. नुकताच अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिंघम अगेनसोबत भूल भुलैया ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता अक्षयने एचटीएलएस 2024 मध्ये चित्रपट सृष्टीतील एकतेच्या कमतरतेसह अनेक विषयांवर भाष्य केले आहे. 'एचटी'च्या मुख्य व्यवस्थापकीय संपादक सोनल कालरा यांनी विचारलेल्या प्रश्नांना अक्षयने उत्तरे देत.
एचटीएलएसमध्ये अक्षय कुमारला राजकारण्यांमध्ये चांगला अभिनेता कोण होऊ शकतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षयने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय कुमारने 'अरविंद केजरीवाल' असे उत्तर दिले. त्यांचे नाव घेण्यामागचा हेतू हे त्यांचे कौतुक होता असे स्पष्टीकरण देखील अक्षय कुमारने दिले आहे.
अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी ही एकमेकांच्या आवडत्या चित्रपटांचा खुलासा केला. अक्षयने अजयचा आवडता चित्रपट दृश्यम असल्याचे सांगितले, तर अजयने हेराफेरी आणि खाकी असे नाव घेतले. अजय देवगणने घोषणा केली की दिग्दर्शक म्हणून त्याच्या पुढच्या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असेल. मात्र, त्यांनी या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देण्याचे टाळले.
दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्यापूर्वी योग्य वेळी कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याबाबत विचारले असता अक्षय कुमार म्हणाला, 'मी योग्य वेळी बाहेर पडलो. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील फरकाबद्दल विचारले असता अजय देवगण म्हणाला की, बॉलिवूडमध्ये एकतेचा स्पष्ट अभाव आहे. मात्र, आपल्यात, अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान यांच्यात कधीही संघर्ष होणार नाही, असे त्याने स्पष्ट केले.
वाचा: आम्ही कधी बोललोच नाही; ९०च्या दशकात श्रीदेवीला टक्कर देण्याबाबत माधुरी दीक्षितने दिली प्रतिक्रिया
अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी मान्य केले की ते राजकारणी किंवा नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करतात परंतु नकारात्मक गोष्टींसाठी त्यांना खाली खेचणे टाळतात.