नुकतीच ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये यंदा मराठी आणी बॉलिवूडसह साऊथच्या चित्रपटांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली आहे. आज ८ ऑक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. दिल्लीमधील विज्ञान भवनात हा सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात २०२२ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसह काम करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून, विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांनाही या कार्यक्रमात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ब्रह्मास्त्र, पोन्नयिन सेल्वन १ आणि अट्टम या चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. रिषभ शेट्टी, नीना गुप्ता, नित्या मेनन आणि सूरज बडजात्या हे देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना उपस्थित राहणार आहेत. डीडी नॅशनलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी चारच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. डीडी नॅशनलच्या यूट्यूब चॅनेलवरही तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचाही या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.
कांतारा (कन्नड) चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर हरियाणवी चित्रपट फौजाला सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला ब्रह्मास्त्रला सर्वोत्कृष्ट चित्रपट एव्हीसीजी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) देण्यात येणार आहे. तिरुचित्रंबलमसाठी नित्या मेनन, कच्छ एक्स्प्रेससाठी मानसी पारेख आणि कांतारासाठी ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट कलाकारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'कांतारा' या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रजत कमळ आणि दोन लाख रुपये असे असणार आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दोन अभिनेत्रींमध्ये विभागला गेला आहे. 'तिरुचित्रांबलम' या तमिळ चित्रपटासाठी अभिनेत्री नित्या मेननला आणि 'कच्छ एक्स्प्रेस' या गुजराती चित्रपटासाठी अभिनेत्री मानसी पारेखला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासाठी दोघींमध्ये र जत कमळ आणि दोन ला ख रुपये बक्षिसाची रक्कम वि भाजित केली जाणार आहे.
संबंधित बातम्या