Bhool Bhulaiyaa 3 OTT Release : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटाला रिलीज होताच अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाशी टक्कर द्यावी लागली होती. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांच्या जबरदस्त क्लॅशचा दोघांच्या कमाईवर परिणाम होणे साहजिकच आहे. मात्र, तरीही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता चाहते हा चित्रपट ओटीटी कधी येणार यांची वाट बघत आहेत. याविषयी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
'भूल भुलैया ३' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर येण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. आता सगळेच हा विचार करत आहेत की, हा चित्रपट रिलीज होऊन एक महिना होत आला आहे, पण त्याची ओटीटी रिलीज डेट अजून समोर आलेली नाही. मात्र, आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सध्या कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया ३' ओटीटीवर प्रदर्शित होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याच वेळी, आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर एक अपडेट समोर आली आहे. नव्या अपडेटनुसार, 'भूल भुलैया ३' नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार नाही, तर जानेवारी २०२५ मध्ये स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.
काही रिपोर्ट्समध्ये, चित्रपटाच्या तारखेबाबत काही कयास बांधण्यात आले आहेत. परंतु, अद्याप कशावरही पुष्टी झालेली नाही. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उघड केलेली नाही. तसेच, हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याबद्दल देखील कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला 'भूल भुलैया ३' हा चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'सिंघम अगेन'सोबत या चित्रपटाची टक्कर झाली होती, पण तरीही या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. यासह हा चित्रपट वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.