'ती तुमच्या वर्गात शिकते का?', ऐश्वर्याला ऐश नावाने आवाज देणाऱ्या फोटोग्राफर्सवर संतापल्या जया बच्चन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'ती तुमच्या वर्गात शिकते का?', ऐश्वर्याला ऐश नावाने आवाज देणाऱ्या फोटोग्राफर्सवर संतापल्या जया बच्चन

'ती तुमच्या वर्गात शिकते का?', ऐश्वर्याला ऐश नावाने आवाज देणाऱ्या फोटोग्राफर्सवर संतापल्या जया बच्चन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 19, 2024 11:22 AM IST

जया बच्चन आणि फोटोग्राफर्स यांच्यामध्ये नेहमीच काही ना काही सुरु असते. एकदा तर ऐश्वर्याला ऐश असा आवाज दिल्यामुळे जया यांनी फोटोग्राफर्सला खडेबोल सुनावले होते.

jaya bachchan
jaya bachchan

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि फोटोग्राफर्स यांच्यामध्ये अनबन कायमच सुरु असते. सतत जया बच्चन यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतत. अनेकदा इवेंटमध्ये जया बच्चन या फोटोग्राफर्सवर चिडताना दिसतात. एकदा तर फोटोग्राफर्सने ऐश्वर्याला चुकीच्या नावाने आवाज दिल्यामुळे जया बच्चन प्रचंड चिडल्या होत्या. चला जाणून घेऊया तेव्हा नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

काय होतं प्रकरण?

ही घटना २०१३मध्ये घडली होती. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या पत्नीची बर्थडे पार्टी होती. त्यांच्या घरी आयोजित केलेल्या या पार्टीला बॉलिवूडमधील कलाकारांना बोलावण्यात आले होते. तेव्हा जया बच्चन देखील पोहोचल्या होत्या. जया बच्चन यांनी जशी एण्ट्री केली तसे फोटोग्राफर सून ऐश्वर्याविषयी विचारायला लागले. 'ऐश कुठे आहे' असा प्रश्न फोटोग्राफर्स जया बच्चनला विचारु लागले होते. ते ऐकून जया बच्चन भडकल्या. त्यानंतर त्या जे काही वागल्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

अॅश म्हणून का आवाज देताय?

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या रिपोर्टनुसार, जेव्हा जया बच्चन या पार्टीला पोहोचल्या तेव्हा फोटोग्राफर्स ऐश्वर्याचे नाव घेऊ लागले. ते 'ऐश कुठे आहे' असे जोरजोरात विचारु लागले. ते ऐकून जया बच्चन नाराज झाल्या आणि 'काय ऐश्वर्या ऐश्वर्या आवाज देताय, ती तुमच्या वर्गात शिकते का?' असा प्रश्न विचारला आहे. जया बच्चन यांचे हे वागणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
वाचा: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? स्पेनमधील मिस्ट्री मॅनचा फोटो व्हायरल

जया बच्चन या नेहमीच फोटोग्राफर्सशी काही तरी विचित्र वागताना दिसतात. त्या सतत फोटोग्राफर्सवर चिडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी हजेरी लावली. पण यावेळी ऐश्वर्या राय मिसिंग नव्हती. अमिताभ बच्चन, श्वेता नंदा, निखिल नंदा, नव्या नवेली, अभिषेक बच्चन हे सर्वजण एकत्र या लग्नाला पोहोचले होते. ऐश्वर्या आणि आराध्या या वेगळ्या लग्नाला आल्या होत्या. त्यामुळे बच्चन कुटुंबात काही तरी खटके उडत असल्याचे दिसत आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच अभिषेकने घस्फोटाशी संबंधीत पोस्ट लाइक केल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले. आता येत्या काळात अभिषेक किंवा ऐश्वर्या यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखे आहे.

Whats_app_banner