मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saif Ali Khan: भर कार्यक्रमात हृतिकने उडवली होती सैफची खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

Saif Ali Khan: भर कार्यक्रमात हृतिकने उडवली होती सैफची खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 18, 2022 03:35 PM IST

Hritik Roshan: सोशल मीडियावर हृतिक रोशल आणि सैफ अली खानचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकची खिल्ली उडवली होती.

सैफ अली खान
सैफ अली खान (HT)

गेल्या काही दिवसांपासून 'विक्रम वेधा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहात. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या दोघेही कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने भर कार्यक्रमात सैफची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. या पुरस्कार सोहळ्यात सैफ अली खान आणि शाहरुख खान दोघे सूत्रसंचालन करत असतात. सैफ हृतिक रोशनची मजा घेण्यासाठी त्याला प्रश्न विचारतो. पण त्याच्या अगदी विरुद्ध घडते. हृतिक रोशन भर कार्यक्रमात सैफ आणि शाहरुखची फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवरुन खिल्ली उडवतो.
वाचा: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ही अभिनेत्री, शेअर केला फोटो

व्हिडीओमध्ये आपण पाहिले की सैफ मंचावरून खाली उतरतो आणि हृतिक रोशनच्या जवळ जाऊन त्याला प्रश्न विचारला ‘बाहेरील तापमान २६ अंश आहे, हवा दक्षिणेकडून उत्तरेकडे वेगाने जात आहे तर तुझे पतंग हवेत कुठपर्यंत उडू शकते?' तेव्हा हृतिक रोशनचा काईट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. म्हणून सैफ मुद्दाम हा प्रश्न ह्रतिकला विचारतो. पण हृतिक देखील त्यावर हुशारीने उत्तर देतो.

हृतिक थोडा अंदाज घेत, ‘माझे पतंग तितकेच उडाले जितका तुझा चित्रपट कुर्बान उडाला होता.’ ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते. ते ऐकून सैफ म्हणतो माझा अपमान केल्याबद्दल धन्यावाद. पण हा प्रश्न शाहरुखने विचारला होता. ते पाहून हृतिक पुन्हा उत्तर देतो की, ‘माझे पतंग तितकेच उडाले जितका तुझा चित्रपट बिल्लू उडाला होता.’ ते ऐकून सर्वांना पुन्हा हसू अनावर होते. हृतिक, सैफ आणि शाहरुखचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग