छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना या पात्रांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र मालिकेचा शेवट काय होणार याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार.
येत्या ३० नोव्हेंबरला 'आई कुठे काय करते' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या भागाचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेचा शेवट हा गोड होणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेमध्ये आता ईशा-अनिशचे नाते आता रुळावर आले आहे, अनघा-अभिषेक देखील जवळ आले आहेत. तसेच ईशा आणि अभिषेकच्या मनात आईविषयी असलेली कटुता दूर होणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेच्या शेवटच्या भागात तरी अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यामध्ये सुरु असलेले वाद कमी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, अरुंधतीने संजना आणि अनिरुद्धला थेट घराबाहेर काढले आहे. तुम्हाला तुमचे आईवडील, तुमची मुलं,तुमची बायको, तुमचं घर,यातलं काहीही सांभाळता आलेलं नाही आणि वाट्याला काय आलं? असे अरुंधती अनिरुद्धला म्हणते.
पुढे अरुंधती म्हणते की,आता तुमची जागा इथे नाही,आता तुमची जागा घराबाहेर आहे..आठवतंय..शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवलीच...आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची की, ‘आई कुठे काय करते ?’
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या २ डिसेंबर पासून निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची 'आईबाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते या मालिकेचा टीआरपी देखील कमी झाला होता. त्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. नेटकऱ्यांनी ही मालिका बंद होत असल्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.