बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो'चा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये 'जिग्रा' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. दिग्दर्शक करण जोहर, आलिया भट्ट आणि वेदांत रैना हे तीनही कलाकार कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसले. दरम्यान, शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नातील फोटो दाखवले. हे फोटो दाखवत असताना त्याने करण जोहरला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.
'द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये आलियाने पती रणबीर कपूर आणि राहाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. कपिल हा शोमध्ये नेहमीच सोशल मीडियावर अनेक कमेंट वाचून दाखवताना दिसतो. अनंत अंबानींच्या लग्नाला गेलेल्या आलिया आणि रणबीरच्या फोटोवर देखील मजेशीक कमेंट्स होत्या. एका यूजरने या फोटोवर, 'आलिया या फोटोत विचार करत आहे की बफेमध्ये काय सर्व्ह केले जाणार ते पाहूया आणि मगच लिफाफ्यामध्ये गिफ्टसाठी किती पैसे द्यायचे याचा विचार करु' अशी कमेंट केली आहे.
'द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सर्व कमेंट वाचत असताना दिग्दर्शक करण जोहरला देखील प्रश्न विचारण्यात आली. अनंत अंबानीला तुम्ही काय गिफ्ट दिले आहे? त्यावर करणने 'आम्ही त्यांना काय गिफ्ट देणार? त्यांना गिफ्ट देण्याच्या आम्ही लायक नाही' असे उत्तर दिले. ते ऐकून कपिलला हसू येते.
यापूर्वी अनन्या पांडेने 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आले होती की, 'अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलेब्सला पैसे मिळतात का?' त्यावर उत्तर देत अनन्या म्हणाली की, "नाही. लोक असा विचार का करतात हे मला कळत नाही. तो माझा मित्र आहे, त्यामुळे त्याच्या लग्नात मी नाचणार हे उघड आहे."
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
आउटलुकच्या एका अहवालानुसार ४ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले. हा खर्च सर्वसामान्यांना खूप वाटत असला तरी अंबानी कुटुंब आपल्या मुलांच्या लग्नासाठी सामान्य भारतीय कुटुंबाच्या तुलनेत कमीच खर्च करत आहे असे म्हटले जाते. कोणतेही भारतीय कुटुंब त्यांच्या एकूण संपत्तीच्या सुमारे ५ ते १५ टक्के खर्च करते, तर अनंत अंबानी-राधिका मर्चंट विवाह अंबानी कुटुंबाच्या निव्वळ संपत्तीच्या केवळ ०.५ टक्के होता.