महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळू हसण्यास भाग पाडले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणाऱ्या गौरव मोरेची घाबरगुंडी उडाली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘अल्याड पल्याड' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे.
अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत सगळ्या वर्गामध्ये उत्सुकता पहायला मिळतेय.
वाचा: ‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारा एस. एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ‘फुलटू एंटरटेनर’ असून मराठीत काहीतरी वेगळं बघायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले
आजवर मराठीत आलेला ‘उत्तम भयपट’ अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक प्रेक्षक करतायेत. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत.
वाचा: बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!
आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.
संबंधित बातम्या