दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री म्हणून समांथा रुथ प्रभू ओळखली जाते. ती सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तरी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजवर समांथाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. समांथाने केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळत आहे. आज २८ एप्रिल रोजी समांथाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
समांथा रुथ प्रभूचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी केरळमध्ये झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिचे नाव यशोदा असे ठेवले होते. समांथाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब होती. तिच्याकडे शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते. मात्र, समांथाने स्वतः काम करून आपली फी भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर घर चालवण्यासाठी समांथाने मॉडेलिंगच्या जगात पाऊल टाकले. दाक्षिणात्य चित्रपट निर्माते रवि वर्मन यांनी समांथाला मॉडेलिंगच्या दिवसात पाहिले आणि तिला काम दिले. त्यांनी तिला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. २०१०मध्ये समांथाने 'ये माया चेसावे' या पहिल्यावहिल्या चित्रपटात काम केले. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटात ती नागा चैतन्य समांथासोबत झळकली होती.
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड
पहिल्याच चित्रपटात काम करताना समंथा नागा चैतन्यच्या प्रेमात पडली होती. समांथा आणि नागा चैतन्य यांनी २०१०मध्येच एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. जवळपास ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २०१७मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र, हे लग्न यशस्वी झाले नाही. समांथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. २ ऑक्टोबर २०२१ रोजी समांथा आणि नागा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याचा तिच्या अभिनयातील कारकिर्दीवर मुळीच परिणाम झालेला नाही.
वाचा: 'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार
आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहणाऱ्या आणि कठोर निर्णय घेणाऱ्या सामंथाला तिच्या करिअरमध्ये फक्त यश मिळाल आहे. ब्रिटीश दिग्दर्शक फिलिप जॉन दिग्दर्शित 'अॅरेंजमेंट्स ऑफ लव्ह' या चित्रपटातून समांथा हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत