Oscar Goodie Bags : जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार सोहळा आज (११ मार्च) पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ९६व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार हा सोहळा आज ११ मार्च रोजी पहाटे 4 वाजता सुरू झाला. नुकतीच या पुरस्कार विजेत्यांची यादी समोर आली. ‘ओपेनहायमर’ चित्रपटाने यंदा सर्वाधिक सात पुरस्कार जिंकले. या सोहळ्यात नामांकन मिळालेल्या न विजेत्यांना एक गुडी बॅग दिली जाते, या बॅगमध्ये नेमकं काय असतं? ते जाणून घेऊयात.
ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या प्रत्येकाला दरवर्षी काही ना काही गिफ्ट दिले जाते. यावर्षी नामांकन मिळालेल्या सर्व स्पर्धक कलाकारांना १ कोटी ४० लाख रुपयांची गुडी बॅग देण्यात आली. या गुडी बॅगमध्ये काय देण्यात आले आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: "तू आई होऊ शकणार नाहीस", जुई गडकरीने सांगितले धक्कादायक वास्तव
‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी गूडी बॅगमध्ये ५० हून अधिक गिफ्ट्स देण्यात आले आहेत. नामांकित व्यक्तींना स्वित्झर्लंडमध्ये ४१ लाख रुपये किमतीचे स्की शॅलेट लक्झरी व्हेकेशन पास मिळाले आहेत. नामांकित लोक या सहलीला नऊ लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात. ते इथे तीन रात्र घालवू शकतात. इतकेच नाही तर दक्षिण कॅलिफोर्नियातील गोल्डन डोअर स्पामध्ये सात दिवसांचा पासही यात समाविष्ट आहे, ज्याची किंमत १९ लाख रुपये आहे.
वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या
या गूडी बॅगमध्ये २७ हजार रुपये किंमतीची हँड बॅग देखील देण्यात आली आहे. एक लाख रुपयांचे पोर्टेबल ग्रिल. त्यासोबतच त्वचा घट्ट करण्यासाठी सायनोस्योरचे मायक्रो नीडलिंग ट्रिटमेंट किट दिले आहे. याची किंमत ८.२ लाख रुपये आहे. या बॅगेतील सर्वात स्वस्त भेट रुबिक्स क्यूब आहे. ज्याची किंमत १२०० रुपये आहे. याव्यतिरिक्त आणखी काही ब्यूटी प्रोडक्ट, स्कीन केअर प्रोडक्ट देण्यात आले आहेत.
ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्यांना हे गिफ्ट देण्यासाठी अकादमी खर्च करत नाही. हे गिफ्ट लॉस एंजलिसमधील मार्केटिंग कंपनी डिस्टिंक्टव असेट त्यांच्याकडून देण्यात येते. पण तुम्हाला माहिती आहे का हे इतके महागडे गिफ्ट स्विकारताना त्या कलाकाराला काही पैसे टॅक्स म्हणून सरकारला द्यावे लागतात. गिफ्ट देण्यात आलेल्या व्यक्तीला ते नाकारण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. रिपोर्ट्सनुसार, गेल्यावर्षी डेंजल वॉसिंगटन आणि जेके सिम्मन्सने हे गिफ्ट चॅरिटीला दिले होते.