Arbaaz Patel On Nikki Tamboli Reaction : अरबाज पटेल बिग बॉस मराठी ५'च्या शो दरम्यान चर्चेत आला होता. रियॅलिटी शो संपून अनेक दिवस झाले असले, तरी अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांची चर्चा अजूनही जोरदार सुरूच आहे. शोच्या आधी तो लिसा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे शोमध्ये तो निक्की तांबोळीच्या खूप जवळ आला तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अरबाजने जाहीर केले होते की, तो कुठेही कमिटेड नाही आणि जर निक्कीला बिग बॉसच्या घराबाहेर रिलेशनशिप अशीच सुरू ठेवायची असेल, तर तो त्यासाठी तयार आहे.
आता नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने लिसा बिंद्रा आणि निक्कीसोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच कुटुंबीयांनी यावर कशी प्रतिक्रिया दिली आहे, हेही त्याने सांगितले. अरबाज म्हणाला की, ‘माझ्या घरच्यांनी याची कधीच पर्वा केली नाही. ते मला म्हणाले की, शोमध्ये काहीही झालं तरी मीडियात येऊ देऊ नकोस. मी त्यांना सांगितलं की, या शोमध्ये अनेक गोष्टी घडू शकतात. मी माझ्या वडिलांना सांगितले की, तिने खरोखरच माझी खूप काळजी घेतली आणि मला सांभाळून घेतलं.’
अरबाज पुढे म्हणाला की, 'मी पप्पांना सांगितले की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या नाहीत. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी उत्तर दिले की जर असे असेल तर तुम्ही मुलीच्या बाजूने उभे राहून योग्य निर्णय घेतला पाहिजे. मी त्यांना सांगितले की, माझ्या शोमधील प्रत्येकजण आमच्या विरोधात होते, फक्त आम्ही एकमेकांसोबत होतो.
अरबाजने एक्स गर्लफ्रेंड लिसा बिंद्रासोबत साखरपुडा केल्याची चर्चा होती. मात्र, या शोनंतर त्याने या अफवा फेटाळून लावल्या. त्याने सांगितले की, त्याचा कधीच साखरपुडा झाला नाही. त्यामुळे दोघांच्या लग्नाची चर्चा देखील अफवाच असल्याचे म्हटले जात आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ या शोबद्दल बोलायचे झाले, तर याचे सूत्रसंचालन रितेश देशमुखने केले होते. बिग बॉस मराठीचा ५वा सीझन सूरज चव्हाणने जिंकला होता. तर, अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. या शोने छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.
संबंधित बातम्या