मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

May 19, 2024 03:18 PM IST

हीरामंडीमधील 'सैयां हटो जाओ' या गाण्यात ‘बिब्बोजान’ फरदीन खानसमोर नाचते आणि यादरम्यान ती गजगामिनी चाल करते. या चालीला 'गजगामिनी चाल' का म्हणतात आणि त्याचा कामसूत्राशी काय संबंध आहे, जाणून घेऊया...

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’?
नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’?

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजला रिलीज होऊन आता दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. पण, या सीरिजची सर्वत्र चर्चा होत आहे आणि यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनली आहे. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी यांसारख्या अनेक दमदार अभिनेत्रींनी या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजमधील अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्या नृत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चला तर, मग जाणून घेऊया व्हायरल व्हिडीओतील आदितीच्या या चालीला 'गजगामिनी चाल' का म्हणतात आणि त्याचा कामसूत्राशी काय संबंध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अदितीची 'गजगामिनी चाल' आहे तरी काय?

संजय लीला भन्साळींच्या वेब सीरिज 'हीरामंडी'मध्ये अदिती म्हणजेच ‘बिब्बोजान’चा मुजरा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फरदीन खानसमोर म्हणजेच सीरिजच्या वली साहबसमोर नाचताना दिसत आहे. यादरम्यान लोक तिच्या मनमोहक हालचाली पाहून सगळे घायाळ झाले आहेत. या गाण्यातील तिच्या कामुक चालीला 'गजगामिनी चाल' म्हटले जात आहेत.

गजगामिनी चाल म्हणजे काय?

हीरामंडीमधील 'सैयां हटो जाओ' या गाण्यात ‘बिब्बोजान’ फरदीन खानसमोर नाचते आणि यादरम्यान ती गजगामिनी चाल करते. पुराण कथांनुसार, संस्कृतमध्ये गजगामिनी चाल म्हणजे हत्तीणीची चाल. म्हणजेच हत्तीणीसारखे चालणे, ठुमके मारणे आणि हळूवारपणे डोलत पुढे जाणे. अनेक वर्षांपूर्वी आचार्य वात्स्यायन यांनी 'कामसूत्र' लिहिले होते, त्यात 'गजगामिनी' चालीचा उल्लेख आहे. आजकाल या चालीला 'स्वान वॉक' म्हणतात. आचार्य वात्स्यायन यांचा हा ग्रंथ सुमारे दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वी रचला गेला असावा, असे म्हटले जाते. 'गजगामिनी' हा शब्द महाभारतातही वापरला गेला आहे.

मधुबालानेही केली होती ‘गजगामिनी’ चाल!

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी'मध्ये 'बिब्बोजान'ची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील एक गाणे ‘सैय्या हटा जाओ तुम बडो वो हो’ सध्या खूप गाजत आहे. या गाण्यातील आदिती रावची 'गजगामिनी' मूव्ह प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. तिच्या या चालीची लोक खूप प्रशंसा करत आहेत. या आधी 'मुगल-ए-आझम' चित्रपटातील 'गज गामिनी' तालावर अभिनेत्री मधुबालाने डान्स केला होता. चित्रपटाच्या शीर्षक गीतावरच तिने 'गज गामिनी' चाल सादर केली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग