मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ११ मेच्या दिवशी बच्चन कुटुंबात नेमकं काय झालं? ऐश्वर्या राय हिचा हात कसा मोडला?

११ मेच्या दिवशी बच्चन कुटुंबात नेमकं काय झालं? ऐश्वर्या राय हिचा हात कसा मोडला?

May 23, 2024 09:29 AM IST

नुकतीच अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी गेली होती. यावेळी प्रवासाला निघताना ऐश्वर्याच्या हातात प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली होती.

११ मेच्या दिवशी बच्चन कुटुंबात नेमकं काय झालं की ऐश्वर्या रायचा हातच मोडला!
११ मेच्या दिवशी बच्चन कुटुंबात नेमकं काय झालं की ऐश्वर्या रायचा हातच मोडला! (REUTERS)

बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. मात्र, यावेळी ऐश्वर्याला पाहून तिचे चाहते काळजीत पडले होते. नुकतीच अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी गेली होती. यावेळी प्रवासाला निघताना ऐश्वर्याच्या हातात प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली होती. मात्र, तिची काळजी घेण्यासाठी मुलगी आराध्याही ऐश्वर्यासोबत कान्स चित्रपट महोत्सवात गेली होती. आराध्या तिच्या आईसोबत सर्वत्र फिरत आणि तिची काळजी घेताना दिसली होती. ऐश्वर्याने आतापर्यंत तिच्या दुखापतीवर मौन बाळगले आहे. ही दुखापत कशामुळे झाली हे तिने सांगितलेले नाही. मात्र, तिच्या एका जवळच्या व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या हातावर प्लास्टरर बांधून फिरताना दिसली. कान्सनंतर ऐश्वर्या भारतात परतली आहे. या दरम्यान जेव्हा ती मतदान करायला गेली, तेव्हाही तिचा हात बांधलेले दिसला होता. आता एका असा रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये तिला ही दुखापत कशी झाली हे सांगण्यात आले आहे. ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याला ११ मे रोजी ही दुखापत झाली आहे. या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याच्या मनगटाला जबरदस्त मार लागला असून, हाडाचे तुकडे झाले आहेत. ती तिच्या मुंबईतील घरात पाय घसरून पडली होती. त्यामुळे ती खूप जखमी झाला आहे.

आता कशी आहे शाहरुख खान याची तब्येत? जवळची मैत्रीण-अभिनेत्री जुही चावला हिने दिली हेल्थ अपडेट!

जखमी ऐश्वर्याने पूर्ण केलं काम!

इतकी मोठी जखम झाल्यानंतरही ऐश्वर्या कामापासून मागे हटली नाही. तिने ठरवले होते की, तिच्या मनगटातील सूज कमी झाल्यानंतर, ती तिच्या सर्व कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करेल. डॉक्टरांनी सांगितल्यावर तिची शस्त्रक्रिया होणार आहे. दुखापतीनंतर अवघ्या दोन दिवसांतच ऐश्वर्याने तिच्या डिझायनरसोबत कॉस्च्युम फिटिंग सेशन केलं होतं. यावेळी आयोजकांना विनंती करण्यात आली होती की, तिला अधिक जागा द्यावी, जिथे ती पोशाख घालून पाहू शकेल आणि जिथे तिला आरामदायी वाटेल, जेणेकरून तिला पुन्हा दुखापत होता कामा नये. वेदना होत असतानाही ऐश्वर्याने तिच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्या.

कान्स लूक होतोय व्हायरल!

ऐश्वर्याचा कान्स लूक सध्या व्हायरल होत आहे. दोन्ही ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. हातावर प्लास्टर असूनही तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव नव्हते. ती या रेड कार्पेटवर चालत गेली आणि पापाराझींसाठी सुंदर पोजही दिल्या. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या शेवट ‘पोन्नियन सेल्वन २’मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने तिच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग