Sunil Pal : कॉमेडियन सुनील पालला किडनॅप करणाऱ्यांनी 'त्या' पैशांचं काय केलं? समोर आला धक्कादायक व्हिडिओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunil Pal : कॉमेडियन सुनील पालला किडनॅप करणाऱ्यांनी 'त्या' पैशांचं काय केलं? समोर आला धक्कादायक व्हिडिओ

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पालला किडनॅप करणाऱ्यांनी 'त्या' पैशांचं काय केलं? समोर आला धक्कादायक व्हिडिओ

Dec 10, 2024 08:37 AM IST

Sunil Pal Kidnapers Video Viral : सुनील पाल यांनी २ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून आपले अपहरण झाल्याचा दावा केला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना मेरठला नेले.

comedian Sunil Pal
comedian Sunil Pal

Sunil Pal Kidnapers Video : नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी धक्कादायक बाबी सातत्याने समोर येत आहेत. सुनील पाल यांनी २ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून आपले अपहरण झाल्याचा दावा केला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना मेरठला नेले. जिथे त्यांना २४ तास एका खोलीत ओलीस ठेवले गेले होते. यानंतर त्यांचे कागदपत्र वापवरून आठ लाख रुपयांची खंडणी ऑनलाइन वसूल करण्यात आली. नंतर त्यांची सुटका झाली. मात्र, या गुन्हेगारांनी त्या पैशांचं काय केलं यांचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

या अपहरणकर्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये ते मेरठच्या ज्वेलर्सकडून सोने खरेदी करताना दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित ज्वेलर्सची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

नेमकं काय झालं?

सुनील पाल यांच्या म्हणण्यानुसार, एका कार्यक्रमाच्या बहाण्याने त्यांना हरिद्वारला बोलावण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली होती. पत्नीने त्यांना फोन केला होता, मात्र फोन उचलला नाही म्हणून त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता झाल्याची नोंद सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली. या दरम्यान आता सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पहिले फुटेज मेरठच्या सदर बाजारातील एका दुकानाचे आहे. ज्यामध्ये २ लोक ४ लाख रुपयांचे दागिने खरेदी करताना दिसत आहेत. नंतर दोन्ही आरोपी लाल कुर्ती बाजारातील एका दुकानात जातात. तेथून २.२५ लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. यावेळी सुनील पाल यांच्या नावाने ज्वेलर्सकडून बिलही काढले जाते.

Comedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

पोलिसांकडून सुरक्षा घेतली नाही!

मुंबई पोलिसांनी दोन्ही ज्वेलर्सची खाती गोठवली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुनील पाल यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले होते. मात्र, पाल यांनी त्यास नकार दिला. पाल यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस दर ३-४ तासांनी त्याला फोन करून त्यांची तब्येत विचारत आहेत. मुलांना भीती वाटू नये, म्हणून सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. ते स्वत: ३-४ वेळा पोलिस ठाण्यात गेले आहेत. अपहरणकर्त्यांनी त्यांचा संपूर्ण मोबाईल डेटा ट्रान्सफर केला होता. पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचे नंबर घेतले होते.

गुन्हेगारांनी डेटा चोरला!

एवढेच नाही, तर आरोपींनी फोनमध्ये उपस्थित सेलिब्रिटींचे नंबरही घेतले. त्यांच्याकडे आता अनेकांची संपूर्ण माहिती आहे, अशी धमकी त्यांनी दिली होती. सुनील पाल यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना शिवीगाळही केली. त्यांनी धक्काबुक्की केली आणि पैसे न दिल्यास विषारी इंजेक्शन देईन, अशी धमकी दिली होती. या दरम्यान सुनील यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना ठेवण्यात आले होते.

Whats_app_banner