Swara Bhasker X Account : अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चित्रपटाशी संबंधित मुद्दा असो किंवा देशाशी संबंधित कोणताही मुद्दा असो, ती आपले मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण आता स्वराचं ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असून, यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापली आहे. यामागे तिचीच एक पोस्ट कारणीभूत ठरली आहे.
रागाच्या भरात स्वराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली की, तिचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे, तेही तिच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पोस्टसाठी. त्यानंतर स्वराने आपल्या कोणत्या पोस्टमुळे अशी कारवाई केली आहे, हे देखील सांगितले. अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिच्या दोन वेगवेगळ्या पोस्टवर कॉपीराइट उल्लंघनाबद्दल चेतावणी देण्यात आली होती, त्यानंतर तिचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत खाते बंद करण्यामागचे कारण काय आहे, ते जाणून घेऊया.
स्वराने लिहिले की, मी एक फोटो पोस्ट केला होता. केशरी पार्श्वभूमी होती आणि त्यावर देवनागरी लिपीमध्ये लिहिले होते - 'गांधी, आम्हाला लाज वाटते, तुमचा खूनी अजूनही जिवंत आहे'. ही भारतातील पुरोगामी चळवळीची लोकप्रिय घोषणा आहे. यामध्ये कॉपीराइटचे उल्लंघन नाही. दुसरा फोटो माझ्या स्वतःच्या मुलीचा फोटो आहे, ज्यात तिचा चेहरा लपवलेला आहे. ती भारताचा झेंडा फडकावत आहे. त्यासोबत लिहिले आहे- प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यामध्ये कॉपीराइटचे उल्लंघन होऊ शकते का? माझ्या मुलीच्या फोटोवरही कॉपीराईट कसा येऊ शकतो? माझ्या मुलीच्या फोटोचा कॉपीराईट कोणाचा आहे? या दोन्ही तक्रारी बकवास आहेत.'
आपली नाराजी व्यक्त करताना स्वरा भास्करने लिहिले की, ‘या दोन्ही तक्रारी कॉपीराइटच्या कोणत्याही कायदेशीर व्याख्येच्या तर्कसंगत, तार्किक आणि वस्तुनिष्ठ आकलनापासून दूर आहेत. जर हे दोन ट्विट मोठ्या प्रमाणात रिपोर्ट केले गेले असतील, तर हा वापरकर्त्याला म्हणजेच मला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा हा प्रयत्न आहे. कृपया हे बघा आणि तुमचा निर्णय बदला. धन्यवाद - स्वरा भास्कर.’
स्वरा भास्करच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा शेवटचा रिलीज 'जहां चार यार' होता. या चित्रपटानंतर स्वरा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आहे. तिने राजकारणी फहाद अहमदशी लग्न केले आणि २०२३ मध्ये एका मुलीची आई झाली. अभिनेत्री सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
संबंधित बातम्या