शेवटच्या भागात माती खाल्ली! 'जवान'च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शेवटच्या भागात माती खाल्ली! 'जवान'च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल

शेवटच्या भागात माती खाल्ली! 'जवान'च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल

Dec 18, 2024 10:04 AM IST

Kapil Sharma On Atlee : कपिल शर्मा आणि 'बेबी जॉन' चित्रपटाचे निर्माते ॲटली कुमार दोघेही चर्चेत आहेत आणि ॲटलीमुळे कपिलला ट्रोल देखील केले जात आहे.

The Great Indian Kapil Show
The Great Indian Kapil Show

The Great Indian Kapil Show : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. अनेकदा तर कपिल शर्माचे नाव वेगवेगळ्या वादांमध्ये अडकत असते. कपिलचे वादांशी तसे जुने संबंध असल्याचे आता सर्वांनाच माहीत आहे आणि आताही तो एका वादामुळे चर्चेत आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या त्याच्या शोच्या दुसऱ्या सीझनची नुकतीच सांगता झाली. मात्र, शेवटच्या भागातच कपिल शर्माकडून एक चूक झाली.

कपिल शर्मा झाला ट्रोल!

कपिल शर्मा आणि 'बेबी जॉन' चित्रपटाचे निर्माते ॲटली कुमार दोघेही चर्चेत आहेत आणि ॲटलीमुळे कपिलला ट्रोल देखील केले जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की कपिलने त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये ॲटलीच्या लूकची खिल्ली उडवली आहे. यावर आता कपिलने स्वतः देखील स्पष्टीकरण दिले आहे. कपिल शर्माने त्याच्या एक्स अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कपिलने लिहिले की, 'प्रिय सर, जेव्हा मी या व्हिडिओत त्यांच्या लूकबद्दल बोललो, तेव्हा काय खिल्ली उडवली? हे तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कृपया सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका, धन्यवाद.' यापुढे कपिलने लिहिले की मित्रांनो, ‘तुम्हीच बघा आणि ठरवा.’

'बेबी जॉन' चित्रपटाची टीम कपिलच्या मंचावर!

अलीकडेच म्हणजे गेल्या शनिवारी 'बेबी जॉन' चित्रपटाची टीम कपिलच्या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी चित्रपट निर्माते ॲटली देखील शोमध्ये दिसला होता. यादरम्यान ॲटली व्यतिरिक्त वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांनी देखील हा . मात्र, हा एपिसोड रिलीज होताच इंटरनेटवर वेगळी चर्चा सुरू झाली.

Laapataa Ladies : मोठा धक्का! आमिर खान-किरण रावच ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

व्हिडिओमध्ये काय आहे?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कपिल ॲटलीला प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे की, 'तुम्ही इतके तरुण आणि अप्रतिम चित्रपट निर्माते आहात. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टारला पहिल्यांदा भेटता, तेव्हा त्याला कदाचित तुम्ही ॲटलीच आहात याची जाणीवही होत नसेल ना? ते विचारत असतील, ॲटली कुठे आहे?' यावर ॲटली यांनी उत्तर दिले की, 'मला तुमचा प्रश्न पूर्णपणे समजला आहे आणि मी त्याचे उत्तर देण्याचाही प्रयत्न करेन.'

ॲटली काय म्हणाले?

ॲटली पुढे म्हणाले की, 'यासाठी मी एआर मुरुगदास सरांचा खूप आभारी आहे, ज्यांनी माझी कथा ऐकली आणि चित्रपट बनवला. मी कसा दिसतो किंवा मी जे केले ते करण्यास मी सक्षम आहे की नाही हे त्यांनी पाहिले नाही. मला वाटते की, लोकांना त्यांच्या दिसण्यावरून नव्हे तर, त्यांच्या कामावरून ठरवले पाहिजे.'

Whats_app_banner