Web Series On Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे मालक अमित जानी यांनी या कुख्यात गँगस्टरच्या आयुष्यावर वेब सीरिज बनवण्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजचे शीर्षक निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर सीरिजमधील कलाकारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. या वेब सीरिजच्या शीर्षकाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे नाव 'लॉरेन्स - अ गँगस्टर स्टोरी' असे निश्चित करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अमित जानी यांनी ही सीरिज बनवण्यासाठी इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडून परवानगी घेतली आहे. त्याचबरोबर मालिकेचे कलाकार आणि अधिक माहिती दिवाळीनंतर दिली जाणार आहे. लॉरेन्स बिश्नोईवर सीरिज बनवण्याआधी अमित जानीने सीमा हैदर आणि उदयपूरचा टेलर कन्हैया लाल यांच्या हत्येसारख्या प्रोजेक्टवर काम करत असल्याची घोषणा केली होती. टेलरने कन्हैया लालच्या हत्येवर बनलेल्या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच केला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. धमकी दिलेल्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले होते की, 'हे हलक्यात घेऊ नकोस. सलमान खान तुला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्ससोबतचे वैर संपवायचे असेल, तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. जर, पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल.
मुंबई पोलीस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यात व्यस्त आहेत. सलमानचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान खानला अनेकदा धमकी दिली आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने यावेळी कडक बंदोबस्तात ‘वीकेंड का वार’ शूट केले आहे.
अमित जानीच्या इतर दोन प्रोजेक्ट्सच्या नावांबद्दल बोलायचे झाले तर, उदयपूरमध्ये कन्हैया लाल साहूच्या हत्येवर आधारित चित्रपटाचे नाव "ए टेलर मर्डर स्टोरी" असेल. सीमा हैदर-सचिन यांच्या कथेवर आधारित सीरिजचं नाव 'कराची ते नोएडा' असं असणार आहे. दोन्ही कथा सत्य घटनेवर आधारित असतील.
संबंधित बातम्या