Ashneer Grover On Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२४वर आता भारतपेचे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे माजी जज अश्नीर ग्रोव्हर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन करताना 'कंटाळवाणा, निर्जीव आणि निरर्थक' असे शब्द वापरले आहेत. इतकंच नाही, तर हा अर्थसंकल्प बघण्यापेक्षा अंबानींच्या लग्नाचा आणखी एखादा सोहळा पाहिला असता, तरं बरं झालं असतं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. सरकारने या अर्थसंकल्पाला ऐतिहासिक आणि सर्वसामावेशक अर्थसंकल्प म्हटले आहे. मात्र, विरोधकांनी त्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान भारत येथे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी या बजेटवर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट शेअर केली आहे. हा अर्थसंकल्प अतिशय कंटाळवणा आणि निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, याच्या ऐवजी अंबानींचाच एखादा लग्न सोहळा पाहिला असता, तर आणखी बरे झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
ट्विटरवर आपली प्रतिक्रिया पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘कंटाळवाणा, निर्जीव आणि अर्थहीन. हा अर्थसंकल्प मांडण्याऐवजी त्या सहज म्हणू शकल्या असत्या की, मला यावेळेस काय करावेसे वाटत नाहीये, काय करायचं असेल तर पुढच्या वेळी बघू…’ या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं की, ‘या अर्थसंकल्पाऐवजी अंबानींचा आणखी एखादा विवाह सोहळा पाहिला असता तर बरं झालं असतं. त्यामुळे माझ्या मौल्यवान वेळेचा अधिक चांगला उपयोग झाला असता’. अश्नीर ग्रोव्हर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४वर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर नेटकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टवर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, ‘हे सरकार तिसऱ्यांदा बनले आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार खूप वाढला आहे. आता हे सरकार सगळ्यांनाच पिळून काढणार आहे.’ तर, आणखी एका युजरने लिहिलं की, ‘ अश्नीर ग्रोव्हर सांभाळून राहा. तुमच्या घरावर ईडी छापा टाकणार आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘नेमकं हे बजेट एखाद्या फिलर एपिसोडसारखं वाटलं. कदाचित पुढच्या वेळी, ते काही उत्साह घेऊन येतील.तोपर्यंत अंबानींच्या लग्नाचा आनंद घेऊया.’
आणखी एक जण म्हणाला की, 'मी सध्या खूप घाबरलो आहे. निर्मला सीतारामन कधीही 'श्वासोच्छ्वासावर' कर लावू शकतात आणि आपण त्यांना काही बोलण्यापूर्वीच 'बोलण्यावर' देखील ही नवा जीएसटी लागू करू शकतात.'
संबंधित बातम्या