८०आणि ९०च्या दशकात बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा अवॉर्ड शो, बर्थडे पार्टी आणि लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांमध्ये पारंपारिक कपडे परिधान करताना दिसायचे. हिंदी सिनेमासाठी हा एक अतिशय साधा काळ होता, जेव्हा कलाकार पार्ट्या आणि गेट-टुगेदरसाठी कोणताही बडेजाव न करता एकत्र जमायचे. ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांच्या लग्नाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, ज्यात अमिताभ बच्चन, जुही चावला, जॅकी श्रॉफ यांसारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पाहुणे म्हणून आलेले दिसत आहेत.
कोमल नाहटा यांच्या लग्नाला अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते. या व्हिडीओची सुरुवात कोमल नाहटा पाहुण्यांना अभिवादन करताना आणि अनिल कपूर आणि जॅकीसोबत पोज देऊन करतात. तर, जुही चावला हसताना दिसत आहे. ऋषी कपूर आणि राकेश रोशन मजेशीर गप्पा मारताना दिसत आहेत. बप्पी लहरी, रणधीर कपूर आणि प्रेम चोप्रा यांच्यासह पाहुणे येताच गोविंदा लग्नात डान्स करताना दिसत आहे. अमिताभ मोठा पुष्पगुच्छ घेऊन कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर ते स्टेजवर येऊन वधू-वरांना आशीर्वाद देताना दिसले आहेत. विनोद खन्ना, शक्ती कपूर, दारा सिंग, अनुपम खेर, सूरज बडजात्या आणि जितेंद्र यांनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने कमेंट केली की, ‘शोऑफ नाही फक्त साधेपणा.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘जुने म्हणजे सोने. त्या साधेपणाची आणि मोहकतेची मला नेहमी आठवण येते. आजकाल आलिशान कपडे घालून एकमेकांशी फक्त वाद घातले जातात.’ एका चाहत्याने जॅकीचे कौतुक केले आणि त्याच्या कमेंटला कॅप्शन दिले, ‘स्टड जॅकी श्रॉफ ’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘हा काळ शुद्ध होता. नो शो ऑफ. साधे लग्न पूर्ण आनंदाने साजरे केले जात होते, आजकाल आपण हा साधेपण बघू शकत नाही. दिसतो तो फक्त दिखावेपणा…’
एका युजरने असेही लिहिले आहे की, ‘आम्ही खरोखरच या सगळ्यामना खूप कॉपी करतो... त्यावेळी प्रत्येक लग्न असेच वाटत होते.’ एका चाहत्याने कमेंट मध्ये लिहिले की, ''९०च्या दशकात सर्व काही इतके साधे होते. कोमल नाहटा ज्येष्ठ निर्माते रामराज नाहटा यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
संबंधित बातम्या