Waheeda Rehman Birthday: एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरची सुरुवात मात्र त्यांनी तेलुगू चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. वहिदा यांचे त्यावेळी लाखो चाहते होते. अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. आज १४ मे रोजी वहिदा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
वहिदा यांनी काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये मुस्लिम असल्यामुळे अनेक अडथळे आल्याचे सांगितले होते. त्यांचा धर्म पाहून भरतनाट्यम शिकवणाऱ्या गुरुजींनी तर नकार दिला होता. या विषयी बोलताना वहिदा म्हणाल्या की, ‘जेव्हा मी चैन्नईमध्ये राहत होते तेव्हा मला भरतनाट्यम शिकण्याची इच्छा होती. म्हणून मी त्यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या गुरुजींकडे गेले होते. मी माझ्या मैत्रीणीला म्हटले की जर मी भरतनाट्यम शिकले तर या गुरुजींकडूनच शिकेन. पण गुरुजी म्हणाले मी या मुलीला शिकवू शकत नाही कारण ती मुस्लिम आहे. जेव्हा मी हट्ट केला की मला त्यांच्याकडेच शिकायचं आहे तेव्हा त्यांनी माझी कुंडली मागितली. पण ती माझ्याकडे नव्हती कारण आमच्या धर्मात कुंडली काढत नाहीत.’
वाचा: गुंतलेल्या नात्यांचे धागे सुटणार? 'चिकटगुंडे २' च्या शेवटच्या भागात मिळणार उत्तर
पुढे त्या म्हणाल्या, ‘त्यानंतर गुरुजींनी माझी जन्मतारीख मागवली आणि माझी कुंडली तयार केली. ती पाहून ते आश्चर्यचकित झाले. कारण त्या गुंडलीनुसार मी त्यांची सर्वात चांगली आणि उत्तम शिष्या ठरणार होते.’
संबंधित बातम्या