मराठी मालिकांचा सामना रंगणार; तुम्हाला कोणती मालिका आवडतेय? आताच मतदान करा!-vote for zee marathi serial for awards appi amchi collector sar kahi ticha sathi tu chal pudhe ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी मालिकांचा सामना रंगणार; तुम्हाला कोणती मालिका आवडतेय? आताच मतदान करा!

मराठी मालिकांचा सामना रंगणार; तुम्हाला कोणती मालिका आवडतेय? आताच मतदान करा!

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 13, 2023 12:24 PM IST

Vote for Marathi Serial: 'अप्पी आमची कलेक्टर', 'सारं काही तिच्यासाठी', 'तू चाल पुढं', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवा गडी नवं राज्य', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', ‘३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये कोणती मालिका तुम्हाला आवडते मतदान करुन नक्की सांगा.

Zee Marathi Awards 2023
Zee Marathi Awards 2023

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आजकाल छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका येताना दिसतात. या मालिकांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसात मिळताना दिसतो. पण प्रेक्षकांची सर्वाधिक आवडती मालिका कोणती? असा प्रश्न सर्वांना पडतो. आता आपल्या आवडत्या मालिकेला सर्वोत्कष्ट मालिकेचा पुरस्कार मिळावा अशी इच्छा असेल तर तुम्ही नक्की मतदान करा.

मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा व कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अतिशय दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. प्रेक्षक पसंतीच्या या अवॉर्ड सोहळ्यासाठी मतदान सुरु झाले आहे. कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची निवड तुम्ही म्हणजेच प्रेक्षक करणार आहात.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डेंचा कोणता गुण आपल्यात यावा? लेक अभिनयचं उत्तर ऐकाच!

यंदा 'अप्पी आमची कलेक्टर', 'सारं काही तिच्यासाठी', 'तू चाल पुढं', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवा गडी नवं राज्य', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', ‘३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये आणि कलाकारांमध्ये चुरस रंगणार आहे. तर काथाबाह्य कार्यक्रमाच्या शर्यतीत 'चला हवा येऊ द्या', 'होम मिनिस्टर', 'वेध भविष्याचा' आणि 'सा रे ग म प लिटिल चॅम्प' हे कार्यक्रम असणार आहेत.

कसं करणार मतदान?

प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेला मतदान करण्यासाठी झी मराठीच्या ऑफिशिअल फेसबुक (http://bit.ly/ZMA2023) पेज वरून किंवा Zee5 वरून सुद्धा मत नोंदवू शकता. मतदान करण्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

विभाग