बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय रिल लाईफपासून दूर असला तरी रिअल लाईफमध्ये चांगलाच सेटल झाला आहे. विवेकने वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या वाईट काळ पाहिला आहे. तो आता भूतकाळ विसरुन पुढे सरकला आहे. मात्र, त्याला अनेकदा मुलाखतीमध्ये भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले जातात. एका पॉडकास्टदरम्यान त्याने सांगितले की, त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागेल हे तेव्हा माहित नव्हते. त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांमुळे विवेकला भीती वाटली होती.
डॉ. जय मदान यांच्या युट्यूब चॅनेलला विवेकने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विवेक म्हणाला, 'एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत संघर्ष करत होतो. 'त्यामुळं मला खूप आर्थिक अडचणी जाणवल्या. मी खूप तणावाखाली होतो. मला अंडरवर्ल्डचे फोन यायचे. मला धमक्या येत असत. हे सगळं मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. हे सर्व एकाच वेळी घडले' असे विवेक म्हणाला.
विवेकने सलमानसोबतच्या भांडणाविषयी या मुलाखतीमध्ये देखील सांगितले आहे. विवेक म्हणाला, 'हा भावनिक प्रतिसाद होता. मी खूप लहान होतो. माझ्या कृतीचा परिणाम काय होईल हे खूप नंतर समजले. मला त्रास सहन करायला हरकत नव्हती. पण जेव्हा माझ्या आई-वडिलांनाही धमक्या येऊ लागल्या तेव्हा मी अस्वस्थ झालो. माझे वडील फोन उचलायचे आणि कोणी तरी त्यांना धमकावायचे. माझी आई फोन उचलायची आणि कोणी तरी त्यांना धमकावून बोलायचे. मला माझ्या बहिणीची भीती वाटत होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की हे प्रँक कॉल्स आहेत. नंतर पोलिसांनी ही धमकी खरी असल्याची पुष्टी केली.'
वाचा: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?
विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामध्ये भांडण आहे . सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन ही विवेक ओबेरॉयला डेट करु लागली होती. पण एक दिवस अचानक विवेकने पत्रकार परिषद घेऊन सलमानचे वागणे सर्वांसमोर आणले . त्यानंतर ऐश्वर्याने कधीही विवेकशी संवाद साधला नाही . पण या सगळ्यामुळे विवेक हा सलमानच्या निशाण्यावर आला .
संबंधित बातम्या