बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असला तरी तो सतत सर्वांचे लक्ष वेधून घेतो. विवेक बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी त्याचा स्वत: चा बिझनेस सुरु केला आहे. आज तो एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर विवेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ३४०० कोटी रुपयांच्या बिझनेसविषयी सांगितले आहे. तसेच, विवेकने तो कधीही प्रवास करताना इकॉनॉमी क्लासने प्रवास करत असल्याचे सांगितले आहे. आता या मागे नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया...
नुकताच फ्रँचायझी इंडियाने झिरो इंटरेस्ट पेमेंट प्लॅन सादर करण्याविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विवेक ओबेरॉय स्वत:च्या ब्रँडविषयी बोलताना दिसत आहे. "मी एक स्टार्ट अप स्थापन केला जो शैक्षणिक फी फायनान्सिंगमध्ये होता, विनातारण होता. ते खूप मोठं झालं. आम्ही बी 2 बी नेटवर्कद्वारे 12,000 शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचलो. पण नंतर आम्ही सी शी कनेक्ट झालो आणि त्या डेटाची मालकी घेतली. आम्ही आमच्या ग्राहकांना थेट ओळखत होतो, म्हणजे 45 लाख लोक जे शाळा किंवा महाविद्यालयात जात होते. हा अतिशय समृद्ध डेटा होता आणि अशाप्रकारे कंपनीचे मूल्य सुमारे 400 दशलक्ष डॉलर (सुमारे 3400 कोटी रुपये) होते.
विवेकने या व्हिडीओमध्ये इकॉनॉमी क्लासने प्रवास करत असल्याचे देखील सांगितले आहे. "जेव्हा मी तिथल्या माझ्या सहवासाचा फायदा घेतला, तेव्हा मला दोन गोष्टी मिळाल्या. त्याचा सकारात्मक सामाजिक परिणाम झाला, जो मी कोण आहे हे मला दाखवत होते. कारण मला तळागाळापासून माझ्या देशात सकारात्मक सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या गोष्टी करायच्या होत्या. त्याचा मला खूप फायदा झाला... जेव्हा मी वैयक्तिकरित्या विमानाने प्रवास करतो, तेव्हा मी फर्स्ट क्लासचे किंवा बिझनेस क्लासचे तिकिट काढत नाही. जेव्हा जेव्हा मी एखाद्या कंपनीसाठीचे तिकिट बूक करतो ज्याचा मी सह-संस्थापक आहे, तेव्हा मी संपूर्ण टीमसह इकॉनॉमी क्लासमधून जातो. त्यामुळे माझी अर्थव्यवस्था बिघडत नाही" असे विवेक म्हणाला.
विवेक बिझनेसम करत असल्यामुळे त्याला चित्रपटांच्या कथेवर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. 'अभिनय ही माझी आवड आहे आणि व्यवसाय हा जगण्याचा आधार. यामुळे मी अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मी माझी आवड पूर्णपणे जोपासू शकेन. मला उगाच कोणता तरी सिनेमा साइन करण्याची किंवा लॉबीसमोर नतमस्तक होण्याची सक्ती नाही. व्यवसायाने मला ते स्वातंत्र्य दिले आहे' असे विवेक म्हणाला.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
विवेक पुढील वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत मस्ती ४ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लवकरच तो टायगर श्रॉफसोबत एका अॅक्शन थ्रिलरचित्रपटाचे आणखी एक शेड्यूल सुरू करणार आहे. विशाल रंजन मिश्रा यांच्या अॅक्शन थ्रिलर 'ग्रे' या चित्रपटाचे चित्रीकरण ही त्याने नित्या मेननसोबत पूर्ण केले आहे. रोहित शेट्टीच्या पहिल्या ओटीटी सीरिज इंडियन पोलिस फोर्समध्ये तो दिसला होता.
संबंधित बातम्या