विवेक ओबेरॉयला मंदिरात भेटला म्हातारा, भविष्यवाणी केली अन् गायब झाला! काय केलेलं भाकीत?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विवेक ओबेरॉयला मंदिरात भेटला म्हातारा, भविष्यवाणी केली अन् गायब झाला! काय केलेलं भाकीत?

विवेक ओबेरॉयला मंदिरात भेटला म्हातारा, भविष्यवाणी केली अन् गायब झाला! काय केलेलं भाकीत?

Dec 08, 2024 12:59 PM IST

Bollywood Kissa : अभिनेता विवेक ओबेरॉय याने त्याच्या आयुष्यात घडलेली एक विचित्र घटना शेअर केली आहे. त्याला मंदिरात एक वृद्ध व्यक्ती भेटला होता, ज्याने एक भविष्यवाणी केली आणि तो गायब झाला. वाचा नेमकं काय म्हणाला होता...

विवेक ओबेरॉय
विवेक ओबेरॉय

Vivek Oberoi Bollywood Kissa : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्याने त्याच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. करिअरच्या सुरुवातीला विवेकने अगदी कमी काळातच खूप लोकप्रियता मिळवली. नुकत्याच एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने आपल्यासोबत घडलेला एक किस्साही सांगितला. त्याने एका वृद्ध व्यक्तीशी झालेल्या भेटीबद्दल एक किस्सा शेअर केला. हा व्यक्ती त्याच्या आयुष्यात एका जादू सारखा आला आणि तसाच निघूनही गेला. 

२००४च्या त्सुनामीनंतर मदतकार्यात मदत करण्यासाठी दक्षिण भारतात गेलेल्या विवेक ओबेरॉयला एका मंदिरात हा वृद्ध व्यक्ती भेटला होता. विवेकने नुकतेच डॉ. जय मदान यांच्या यूट्यूब चॅनेलवरील एका कार्यक्रमादरम्यान आपले आध्यात्मिक अनुभव शेअर केले.  यावेळी तो म्हणाला की, ‘एक प्रसिद्ध मंदिर आहे जिथे मला एक अनोखा अनुभव आला. त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या खूप चिंतेत होतो. मला काही प्रॉब्लेम होते... मी त्सुनामीत वाचलेल्या लोकांसाठी तंबू उभारला आणि त्यांच्यासोबत राहिलो. मी थोडं तमिळही शिकलो. त्यावेळी मला कुणीतरी मंदिरात जायला सांगितलं; मी गेलो. तिथे मला पांढरी दाढी असलेला एक म्हातारा भेटला. त्याने फक्त धोतर घातले होते. त्याने मला त्याच्याकडे बोलावले.’

Raja Gosavi: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक

काय भाकीत केलं?

विवेक पुढे म्हणाला, 'तो माझ्याशी अगदी अस्खलित इंग्रजीत बोलू लागला. मी गोंधळून गेलो होतो, कारण तो व्यक्ती मंदिराच्या कोपऱ्यात काहीही न घालता बसला होता. त्याने मला त्याच्या शेजारी बसवले आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. तेव्हा तो मला म्हणाला, 'तू खूप चिंतेत आहेस, तू दुर्दैवी आणि कठीण काळातून जात आहेस आणि म्हणूनच तुला या मंदिरात पाठवण्यात आले आहे. येत्या काळात तुला मोठं आर्थिक नुकसान होणार होतं, पण तु त्यातून सुदैवाने वाचणार आहेस. तुला जे पैसे गमवावे लागणार होते, ते तू इथल्या मदतकार्यावर खर्च केलेस. हे तुझे कर्म आहे आणि त्याचे फळ तुम्हाला मिळेल. 

तो तिकडे नव्हताच!

यानंतर विवेक म्हणाला की, ‘त्या म्हाताऱ्याने मला काही सूचना दिल्या, ज्या पूर्ण करण्यासाठी मी गेलो होतो. पण मी परत आलो तेव्हा, तो म्हातारा देवळात नव्हता. मी वॉचमनला आणि इतरांना विचारलं की, तो म्हातारा कुठे गेला. त्यावर वॉचमन म्हणाला की, कोणता म्हातारा? इथं कुणीच नव्हतं. ती जागा रिकामीच आहे. हे ऐकून मी स्तब्ध झालो. तो माणूस खरा होता की, नाही याची मला आजतागायत खात्री नाही. पण तो माझ्यासाठी देवासारखा होता.'

Whats_app_banner