Vivek Oberoi: ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयचा ब्रेकअप का झाला? काय होते नेमके कारण वाचा-vivek oberoi and aishwarya rai breakup know about in details ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vivek Oberoi: ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयचा ब्रेकअप का झाला? काय होते नेमके कारण वाचा

Vivek Oberoi: ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयचा ब्रेकअप का झाला? काय होते नेमके कारण वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 03, 2024 07:47 AM IST

Vivek Oberoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय विवेक ऑबेरॉयला डेट करत होती. पण त्यांचा ब्रेकअप का झाला चला जाणून घेऊया...

Vivek Oberoi and Aishwarya Rai
Vivek Oberoi and Aishwarya Rai (HT)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान, ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले. पण सलमानचे वागणे पाहून ऐश्वर्याने ब्रेकअप केला होता. त्यानंतर ती अभिनेता विवेक ओबेरॉयला डेट करु लागली होती. दोघांचे खूप चांगले सुरु असताना अचानक ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पण त्यांचा ब्रेकअप नेमका कशामुळे झाला? याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आज ३ सप्टेंबर रोजी विवेक ओबेरॉयचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या लव्हलाइफ बद्दल...

विवेकने सलमानवर केले आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान हा ऐश्वर्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल फार पजेसिव होता. कदाचित त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाला. यामुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात वादही झाल्याचेही बोलले जाते. परंतु सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिनेता विवेक ऑबेरॉय एकत्र आले होते. त्यात ऐश्वर्या ही विवेकसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होती. सगळे काही ठिक सुरु असतानाच एके दिवशी विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर आरोप केल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली.

ऐश्वर्याने विवेकसोबत केला ब्रेकअप

विवेक ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपमुळे सलमान विवेकवर रागावलेला होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली आणि विवेकने दोघांचे कॉल रेकॉर्ड जगजाहिर केले. या सगळ्यामुळे ऐश्वर्या फार गोंधळलेली आणि संतापली होती. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये मोठा गदारोळ झाला होता. तेव्हापासून विवेकला चित्रपटांत काम मिळणे बंद झाले. त्याचबरोबर ऐश्वर्यानेही विवेकसोबतचे रिलेशनशिप संपवले होते. आणि त्यानंतर काही वर्षांनी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले.
वाचा: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा

एका मुलाखतीत याविषयी बोलताना विवेक म्हणाला होता की 'मला हा गोंधळ करण्यासाठी माझ्या जवळच्या लोकांनी भडकावले होते. 'तेव्हा विवेकचा हा इशारा ऐश्वर्याकडेच होता, असे म्हटले जाते. त्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली होती तर काहींनी शांत राहणे पसंत केले. त्यावेळी जर विवेक शांत राहिला असता तर ऐश्वर्याने कधीही रिलेशनशिप तोडली नसती असेही मत अनेकांनी मांडले होते.

विभाग