बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हा त्याच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्यानंतर आता एक नवा चित्रपट घेऊन विवेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'द व्हॅक्सिन वॉर' असे आहे.
'द व्हॅक्सिन वॉर' . हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा ही सर्वांना आपल्या जवळची असल्याचे भासणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. तसेच चित्रपटाचे पोस्टर पाहाता आता चित्रपटात काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वाचा: रात्रभर खूप रडलो...; किरण मानेंचा रिलेशनशीपबाबत मोठा खुलासा
बर्याच गेसिंग गेम्सनंतर, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अखेर त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले असून, शीर्षकासह चित्रपटाच्या पोस्टरचे देखील प्रदर्शित केले आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेचाही उल्लेख आहे. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' नंतर विवेक रंजन अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी बातमी आहे. शिवाय, या घोषणेसह, चित्रपट निर्मात्याने देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय कसा हाताळला जाईल असा प्रश्न सर्वांना पाडले आहे. पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. लस युद्धाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आणि आमच्या शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी कोण योग्य ठरेल हे पाहणे मनोरंजक असेल.
संबंधित बातम्या