चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री हे अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत जे कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. केवळ विवेकचं विधानच नाही तर त्याचे सिनेमेही खूप चर्चेत असतात. आता विवेकने एक किस्सा सांगितला जेव्हा त्याने एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकले. कारण त्याचा मॅनेजर खूपच अनप्रोफेशनल होता. आता नेमकं काय झालं होतं हे चला जाणून घेऊया...
विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 'मला गेल्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकावे लागले. कारण त्याच्या मॅनेजरचे वर्तन चांगले नव्हते. तो अतिशय अनप्रोफेशनल होता. तेही फक्त तो एका मोठ्या सेलिब्रिटीच्या स्टार किडच्या टॅलेंट एजन्सीमध्ये काम करत होता म्हणून. या अशा लोकांमुळे अनेकांचे करिअर उद्धवस्त झाले आहे. कार्यशाळा घ्या आणि अशा मुलांना प्रशिक्षण द्या मुकेश छाब्रा' असे विवेक अग्निहोत्री म्हणाला.
मुकेश यांनी विवेकची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यांनी, 'सध्या चित्रपटसृष्टीची अवस्था अभिनेता, 200 कास्टिंग डायरेक्टर आणि 15,680 मॅनेजर अशी आहे' असे म्हटले आहे.
बॉलिवूडमध्ये मॅनेजरच्या भूमिकेबाबत इंडस्ट्रीत बरीच चर्चा सुरू आहे. त्यांच्या मदतीने अभिनेत्याची कारकीर्द आकार घेते, असे अनेकांना वाटते. तर काहींचे म्हणणे आहे की, असे मध्यस्थ चांगले टॅलेंट बाहेर येऊ देत नाहीत. असे असूनही आज असा एकही सेलिब्रिटी नाही ज्याचा मॅनेजर नाही.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा
विवेकच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो आता पर्व अॅन एपिक टेल ऑफ धर्मा या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट महाभारतावर आधारित असणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये विवेकने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. याशिवाय तो 'द दिल्ली फाइल्स' हा चित्रपटही आणणार आहे.