Urfi Javed New Outfit : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट आउटफिटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती अतिशय वेगळ्या अशा रोबोटिक लूकमध्ये दिसत आहे. तिने जाळी, बोल्ट आणि मोबाईल डिव्हाइसच्या मदतीने एक आउटफिट डिझाईन केला आहे, ज्यात ती सायबोर्गसारखा लुक देताना दिसत आहे. उर्फी जावेदने या आउटफिटमध्ये वेगवेगळ्या अँगलमधून आपले फोटोशूट केले आहे. पण, पुन्हा एकदा कमेंट सेक्शनमध्ये लोक तिला ट्रोल करताना दिसले आहेत.
कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलं की, ‘न्यू लुक मच्छरदाणी’. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, ‘डॉक्टर काय म्हणाले, तू किती दिवसांत बरी होशील?’ उर्फी जावेदच्या एका फॉलोअरने कमेंट केली की, ‘उर्फीबद्दल एक गोष्ट अशी आहे की, लोक तिला कितीही वाईट म्हणत असले, तरी ती सर्वांकडे दुर्लक्ष करते आणि आयुष्यात पुढे जात राहते.’ एका युजरने या आउटफिटचं कौतुक करत लिहिलं की, ‘तू एकदम मस्त दिसत आहेस.’
एकाने कमेंट करत उर्फीला विचारलं की, तिच्या ड्रेसमधील आयपॉड काय काम करते? तर एका युजरने अभिनेत्रीला म्हटले की, ती चालती-बोलती कोकेन आहे. अभिनेत्रीच्या एका फॉलोअर्सने कमेंट केली की, ‘उर्फीची क्रिएटिव्हिटी लेव्हल दिवसेंदिवस वाढत आहे’. खुद्द उर्फी जावेदने हे फोटो पोस्ट करताना एक नटखट कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - ‘स्क्रू लूज’. तिच्या या ड्रेसचे वजन २० किलोपेक्षा जास्त आहे. उर्फी जावेदने आतापर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टींपासून आउटफिट्स बनवून फोटोशूट केले आहे.
‘बिग बॉस ओटीटी’मुळे चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीला बिग बॉसपेक्षा जास्त तिच्या कपड्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. तिने अगदी पॉलीबॅगपासून आउटफिटही तयार केले आहेत. यानंतर तिने वायरपासून, जूटच्या पोत्यापर्यंत आणि दगडांपासून काचेच्या तुकड्यांपर्यंत ड्रेस डिझाईन केले आणि त्यात फोटोशूट केले. उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात फार काळ टिकू शकली नाही आणि त्या सीझनमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली होती. परंतु त्यानंतर तिच्या आउटफिटमुळे ती खूप कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाली.
संबंधित बातम्या