बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखी सतत अशा गोष्टी करत असते, ज्यामुळे ती प्रसिद्धी झोतात येते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून राखी सावंत हिने भारत सोडून दुबईमध्ये राहायला सुरुवात केली आहे. मात्र, हा निर्णय घेणं आपली मजबुरी असल्याचे राखीने म्हटले आहे. सध्या राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राखी रडत रडत भारत सरकारला एक विनंती करताना दिसली आहे. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मागितला आहे.
राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून भारताबाहेर राहत आहे. फराह खानच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये तिने दुबईत प्रॉपर्टी घेऊन, तिथेच राहू लागल्याचे सांगितले होते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय की, तिला जामीन हवा आहे. ती निर्दोष आहे, तिला आपल्या देशात परत यायचे आहे. स्मशानभूमीतून आईच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी देखील सतत फोन येत आहेत, असेही राखीने म्हटले आहे. यावेळी राखीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.
राखी आणि तिचा माजी पती आदिल दुर्राणी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुरुंगवास भोगावा लागू नये म्हणून ती सध्या भारताबाहेर आहे. राखी सावंत सध्या दुबईत राहत आहे. आता तिने एक व्हिडीओ बनवून म्हटले की, ‘मी मोदीजी, भाजप सरकार, मुंबई पोलिस मी सगळ्यांना विनंती करते की, मला जामीन मिळवून द्यावा. आरोपपत्र देखील बनवण्याची विनंती करू इच्छिते. मी निर्दोष आहे. मला मुद्दाम फसवले जात आहे. माझ्यावर अन्याय होत आहे. मला माझ्या देशात परत यायचे आहे. मी दोन वर्षांपासून दुसऱ्या देशात राहत आहे.’
राखी म्हणाली, ‘माझी आई वारली. मला स्मशानभूमीत जायचे आहे. मला माझ्या आईला भेटायचे आहे. माझ्या आईच्या अस्थी घ्यायच्या आहेत. स्मशानभूमीतून रोज फोन येतात की, २ वर्षे झाली, तुमची आईच्या अस्थी कधी घेऊन जाणार… मला माझ्या देशात परत यायचे आहे. हे लोक मला अटक करण्याची धमकी देत आहेत. जामीन मिळू देत नाहीत. अटक करण्याची धमकी देखील देत आहेत. मला न्याय हवा आहे.’