सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला अशा प्रकारे धक्का दिला आहे की ती जोरात पडली असती. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमाला अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासोबतच अभिनेत्री अंजली आणि नेहा शेट्टीदेखील उभी असल्याचे दिसत आहे. तिघेही या कार्यक्रमात आलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. पण नंदमुरी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नंदमुरी यांना स्वत:ला स्टेजवर नीट उभे राहायचे असल्यामुळे त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या अभिनेत्रींना सकरण्यास सांगितले. अंजलीने साडी नेसल्यामुळे तिला पटकन मागे होता आले नाही. त्यामुळे नंदमुरी यांनी पटकन तिला जोरदार धक्का दिला आहे. अचानक धक्का लागल्यामुळे अंजली मागे ढकलली गेली.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार
अंजलीने कसाबसा स्वत: चा तोल सावरला. नेहाने हात देऊन अंजलीला आधार दिला. इतक्या जोरात धक्का देऊनही नंदमुरी अंजली आणि नेहाशी काही तरी बोलत असल्याचे पाहायला मिळाले. आता नंदमुरी यांना त्यांच्या कृतीमुळे ट्रोल केले जात आहे.
Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ गँग ऑफ गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमातील आहे. या चित्रपटात अंजली, नेहा आणि विश्वाक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अंजली ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अंगादी थेरु, सिताथामा वकिटलो आणि इतर काही चित्रपटात काम केले आहे.
अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट