
बॉलिवूडचे पॉवर कपल कजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा ही सतत चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती हिंदी बोलताना अडखळली आहे. या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
न्यासाला अनेकदा पार्ट्यांमध्ये सर्वांनी पाहिले होते. मात्र तिचा आवाज आजवर कोणी ऐकला नव्हता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये न्यासा हिंदीमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहे. ती अडखळत हिंदी बोलत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
वाचा: गुपचूप काढलेला फोटो पाहून आलिया संतापली, फोटोग्राफरविरोधात केली पोलीस तक्रार
नुकताच ग्रामिण अहमदनगरमध्ये शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला न्यासाने हजेरी लावली. त्यावेळी तिला भाषण देण्यास सांगण्यात आले. भाषण देताना न्यासा अडखळत होती, तिला हिंदी शब्द सुचत नव्हते. 'मी जेव्हा लहान होते मला वाचन करायला खूप आवडायचे. मी दररोज २ ते ३ पुस्तके वाचायची. माझ्या आईला माझे वाचन खूप आवडायचे. तुम्हाला पाहून मला आनंद झाला. तुम्ही कधीही शिक्षण घेणे थांबवू नका' असे ती म्हणाली. पण बोलताना हिंदी शब्द सुचत नसल्यामुळे न्यासाला ट्रोल करण्यात आले आहे.
एका यूजरने ‘भारतात राहून हिला साधं हिंदीही बोलता येत नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हिला हिंदी चित्रपटात घेऊ नका’ असे म्हटले आहे.
न्यासाने स्वित्झरलँडमधील Glion Institute of Higher Educationमध्ये शिक्षण घेतले आहे. यापूर्वी ती तीन वर्षे सिंगापूरमध्ये शिक्षण घेत होती. न्यासाचा जन्म २००३ साली झाला. न्यासा ही केवळ १९ वर्षांची आहे. अनेकदा अजयला तिच्या बॉलिवूड पदार्पणबाबत प्रश्न विचारले जातात. एकदा अजयने, “न्यासाला अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे की नाही हे सध्या तरी मला माहित नाही. अजून तरी तिला त्यात रस नाही. पण वेळेनुसार ते बदलूही शकते” असे म्हटले होते.
संबंधित बातम्या
